लोणी दि.२०( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलने आयोजित केलेल्या १२ वर्षे वयोगटातील निमंत्रित फुटबॉल करंडक स्पर्धेत प्रवरा पब्लिक स्कूलच्या पी पी एस लेजंड या संघाने अंतिम सामन्यात घवघवीत यश संपादन केले.अशी माहिती प्रवरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे यांनी दिली.
प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरानगर येथे १२ वर्ष वयोगटातील प्रवरा निमंत्रित फुटबॉल करंडक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचा शुभारंभ संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यांच्यासमवेत प्रवरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे, प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलच्या प्राचार्या डॉ. बेलीम रोजबिन इ. मान्यवर उपस्थित होते.
सदर फुटबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्यातून एकूण सहा संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेतील पहिला सामना हा पी पी एस लेजंड विरुद्ध यश अकॅडमी सोनई यांच्यात झाला. त्यामध्ये पी पी एस लेजंड या संघाने ९-० असा एकतर्फी विजय संपादन केला. या स्पर्धेत तीन-तीन संघांचे दोन गटातून साखळी सामने खेळवले गेले.पहिल्या गटातून पी पी एस लेजंड व दुसऱ्या गटातून पी सी पी एस विनर्स हे दोन संघ अंतिम फेरीत पोहोचले.अंतिम सामन्यात पी पी एस लेजंड संघाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करून ७ – ० अशा फरकाने विजय संपादन केला व १२ वर्षे वयोगटाखालील निमंत्रित फुटबॉल करंडकावर आपले नाव कोरले.अंतिम सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मास्टर रामचंद्र पालवे यास ‘मॅन ऑफ द मॅच’ तर संपूर्ण साखळी सामन्यातील उत्कृष्ट व सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल मास्टर जयवर्धन माने-देशमुख याने “बेस्ट स्कोरर ऑफ द टूर्नामेंट” हा बहुमानाचा किताब पटकावला.त्याने संपूर्ण स्पर्धेत नऊ गोल करून आपल्या संघासाठी चमकदार कामगिरी केली.प्रामुख्याने १४,१७ व १९ वर्ष या वयोगटातील खेळाडूंसाठी सातत्याने स्पर्धा आयोजित केल्या जातात. परंतु संस्थेच्या सी ई ओ डॉ. सुष्मिता विखे यांच्या अनोख्या संकल्पनेतून १२ वर्षे वयोगटातील ही स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित केली गेली. या स्पर्धेसाठी समता इंटरनॅशनलचे प्रा.शुभम औताडे व यश अकॅडमीचे प्रा.आसिफ शेख यांनी पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली.
प्रवरा निमंत्रित फुटबॉल करंडकाच्या यशस्वी आयोजनाबद्दल व खेळाडूंनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,खा.डाॅ.सुजय विखे पाटील,सहसचिव भारत घोगरे, संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ. सुष्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ. शिवानंद हिरेमठ, माध्यमिक शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे, समन्वयक श्री.नंदकुमार दळे यांनी विशेष कौतुक केले.
तसेच शाळेचे प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे, उपप्राचार्य श्री. के.टी अडसूळ,पर्यवेक्षिका सौ. जगधने,सौ. रत्नपारखी यांनी विजेता खेळाडूंचे अभिनंदन केले. स्पर्धेचे समालोचन शाळेचे शिक्षक श्री. एस डी ढगे व श्री. संदीप वराळे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी शाळेचे क्रीडा संचालक श्री. डी.के जाधव, श्री.पटेल,फुटबॉल कोच श्री. अवनीत सिंग यांनी मोलाची भूमिका निभावली.