14.4 C
New York
Saturday, October 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये निवड

लोणी दि.२०( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण संस्थेच्या प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालय लोणी येथील अनुक्रमे एम. फ़ार्म अभ्यासक्रमातील तीन आणि डी. फार्मसी अभ्यासक्रमातील तीन अशा सहा विदयार्थ्यांची मॅकलिओड्स फार्मासुटिकल्स या बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भवर यांनी दिली.

एम. फार्मसी मधून विलास अमुगे, पूनम वडीतके आणि वैष्णवी गलांडे यांची मॅकलिओड्स फार्मासुटिकल्स मुंबई येथे वार्षिक ४ लाख रुपये वेतन श्रेणी मध्ये निवड झाली.

औषधनिर्माणशास्त्रमध्ये अतिशय महत्वाचा समजला जाणारा विभाग म्हणजे संशोधन आणि विकास व त्या विभागामध्ये एम. फार्मसीच्या तीन विद्यार्थ्यांची निवड होणे म्हणजे महाविद्यलयाच्या दृष्टीने विशेष बाब आहे. तसेच डी. फार्मासिच्या तीन विद्यार्थ्यांची उत्पादन विभागात १ लाख ८०हजारांचे च्या वार्षिक वेतन श्रेणी मध्ये निवड झाली.विदयार्थ्यांना त्यांच्या अंतिम परीक्षेपूर्वी नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने त्यांच्यामध्ये चैतन्याचे वातावरण आहे. प्रवरा हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी कायमच अग्रभागी असते.महाविद्यालयात नेहमी विद्यार्थ्यांसाठी विविध प्रशिक्षणआयोजित केले जाते.महाविद्यालयात स्वतंत्र ट्रैनिंग व प्लेसमेंट विभाग कार्यरत असून त्याचा विद्यार्थ्यांना नेहमी फायदा होत असतो.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ, संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. मनोज परजणे यांनी तसेच महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. एम. पाटील,प्राचार्य डॉ संजय भवर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!