4 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

आयोध्येतील प्रभू श्रीरामांचे मंदिर भक्ति आणि शक्तीचे केंद्र ठरणार-ना.विखे पाटील श्रीदत मंदीरात स्वच्छता अभियान संपन्न कारसेवक उतमराव करपेचा केला सत्कार 

संगमनेर दि.२०( जनता आवाज वृत्तसेवा ):-आयोध्‍येमध्‍ये उभे राहत असलेले प्रभू श्रीरामांचे मंदिर हे केवळ भक्ती आणि शक्‍तीचे केंद्र नसून, प्रचंड उर्जा, त्याग आणि दृढनिश्‍चयाच्‍या प्रतिका बरोबरच हिंदु अस्मितेचा स्‍त्रोत बनणार आहे. या एैतिहासिक क्षणाचा आनंद व्दिगुणीत करण्‍यासाठी गावोगावी आनंदोत्‍सव साजरा करावा असे आवाहन महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोध्‍येमधील श्रीराम मंदिराच्‍या लोकार्पण सोहळ्याच्‍या निमित्‍ताने मंदिर स्‍वच्‍छतेच्‍या केलेल्‍या आवाहानाला प्रतिसाद म्‍हणून, मंत्री विखे पाटील यांनी कार्यकर्त्‍यांसह संगमनेर बस स्‍थानका जवळील श्री.दत्‍त मंदिरात स्‍वच्‍छता अभियान राबविेले. स्‍वच्‍छता कामगारांशीही त्‍यांनी संवाद साधून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीकाना त्‍यांनी मार्गदर्शन केले. जेष्‍ठ कार्यकर्ते आणि कारसेवेत सहभागी झालेले उत्‍तमराव कर्पे यांचा मंत्री विखे पाटील यांच्‍याहस्‍ते विशेष सत्‍कार करण्‍यात आला. या प्रसंगी महायुतीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, आयोध्‍येमध्‍ये भक्‍तीमय वातावरणात असलेला मंदिर लोकार्पण सोहळा हा प्रत्‍येक भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. संपूर्ण भारत देश आता राममय झाला असून, रामलल्‍लाच्‍या स्‍वागतासाठी देश सज्‍ज झाला आहे. या एैतिहासिक क्षणामुळे लाखो हिंदूचे स्‍वप्‍न पुर्ण होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या कार्यकाळातील आणि भारताच्‍या इतिहासातील एक सुवर्ण पर्व ठरणार आहे असे स्‍पष्‍ट करुन, एकीकडे देश आज मोदीजींच्‍या नेतृत्‍वाखाली विश्‍वगुरु बनण्‍याच्‍या संकल्‍पावर यशस्‍वीपणे वाटचाल करीत आहे. जगातील तिसरी मजबुत अर्थव्‍यवस्‍था म्‍हणून भारत देशाची ओळख आता जगामध्‍ये निर्माण होत आहे. याच एैतिहासिक पर्वामध्‍ये श्रीराम मंदिराचे होत असलेले लोकार्पण ही देशवासि‍यांच्‍या दृष्‍टीने मोठी एैतिहासिक घटना घडत आहे. या आनंदामध्‍ये सर्वांनीच सहभागी होण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.

एकीकडे राम मंदिर निर्माणाचा आनंदोत्‍सव साजरा होत असताना दुसरीकडे या कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारुण कॉग्रेस पक्षाने लाखो रामभक्‍तांचा अपमान केला आहे. दुसरीकडे प्रभू श्रीरामांबद्दल अवमानकारक भाषा वापरणा-या व्‍यक्तिचा या संगमनेरात सत्‍कार होतो, याचा निषेध करुन, मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, हिंदू प्रत्‍येक निर्णयाला विरोध करण्‍याची भूमिका आज देशामध्‍ये जाणीवपुर्वक सुरु आहे. मात्र दुसरीकडे आयोध्‍येमध्‍ये राम मंदिराची निर्मिती करताना मुस्लिम समाजाच्‍या प्रार्थणा स्‍थळाची उभारणी करण्‍याचे कामही पंतप्रधान मोदीजीच करु शकतात. त्‍यामुळे या देशात हिंदू धर्माबद्दल अनुउद्गार काढणा-यांना शेजारी कोण बसवून घेते हे जनतेने ओळखले पाहीजे. जे हिंदू धर्माच्‍या विरोधात बोलतात त्‍यांचा निषेध करण्‍याची हिंमत उध्‍दव ठाकरेदाखवू शकत नाही अशा शब्‍दात त्‍यांनी महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यावर टिकास्‍त्र सोडले.

संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीतून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून शहरातील मारुती मंदीराच्या सभामंडपाच्या निधीस तत्वता मान्यता दिल्याचे सांगून आयोध्येतील कार्यक्रमाच्या क्षणाचे औचित्य साधून निळवंडे धरणांच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

मंत्री विखे पाटील यांनी शहरातील पंजाबी कॉलणीतील मंदिरात जावून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्‍या पुतळ्यासही अभिवादन केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!