लोणी दि.१६ ( जनता आवाज
वृत्तसेवा ):-कोणत्याही क्षेत्रातील त्याच्या योगदानावरून त्यास नावलौकिक प्राप्त होतो मग ती कंपनी असो किंवा संस्था प्रवरा शैक्षणिक संस्थेने आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्यातून व योगदानातून आपला वेगळाच ठसा उमटवलेला आहे याचे फलित म्हणून आज देशोविदेशी प्रवरा शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहे प्रवरा म्हणजे विश्वासहार्तता असे समीकरण बनले आहे असे प्रतिपादन पायरेन्स चे संचालक सचिव डॉक्टर निलेश बनकर यांनी केले.
प्रवरेच्या पायरेन्सच्या विविध संस्थांचे नवीन स्वरूपातील आकर्षक अशा लोगोचे अनावरण महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये पायरेन्स , पायरेन्स आय बी एम ए आणि डॉ विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या लोगो म्हणजेच प्रतीक चिन्हांचा समावेश आहे.
कार्यक्रमास पायरेन्स आय बी एम ए चे संचालक डॉ.मोहसीन तांबोळी डॉ.अश्विनी बोरा डॉ. सतीश बिडकर प्रा. प्रमोद बोऱ्हाडे डॉ. मनोज कुमार लंगोटे डॉ. प्रा. ऋतुजा कोतकर प्रा.पूजा परजणे प्रा. रेणुका तनपुरे प्रा योगेश आहेर प्रा.धनंजय बोऱ्हाडे प्रा ऋषिकेश धर्माधिकारी प्रा कृष्णा बोरुडे प्रा रणीता वल्लावे प्रा. निलेश आवारी प्रा.प्रमोद गोपाळे श्री रावसाहेब कानडे श्री अमोल शिरसाठ याचबरोबर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेंद्र खर्डे यांनी केले.