8 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

spot_img
spot_img

श्रीरामपूर शहरात रामनामाचा जयघोष! मंत्री विखे पाटील यांच्या महाआरती आणि कारसेवकांचा सत्कार 

 श्रीरामपूर  दि.२०( जनता आवाज  वृत्तसेवा ):-महसूल पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शहरातील ऐतिहासिक श्रीराम मंदीरात महाआरती करण्यात आली. रामनमाच्या जयघोषाने अवघे शहर दुमदूमून गेले.कारसेवकांचा सत्कार आणि आयोध्येच्या कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांनी उपस्थित भाविकांना दिले.

आयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या मंदीर लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी शहरातील हनुमान मंदीर आणि श्रीराम मंदीरात दर्शन घेतले.हजारो भाविकांच्या उपस्थित महाआरती करण्यात आली.जय श्रीरामांचा जयघोष आणि आयेगे आयेगे राम आयेंगे या गाण्यावर भाविकांनी ताल धरून या ऐतिहासिक क्षणाचा आनंद द्विगुणीत याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष दिपक पठारे सरचिटणीस नितीन दिनकर प्रकाश चिते शरदराव नवले नानासाहेब शिंदे

यांच्यासह शहर आणि तालुक्यातील सर्व हिदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.विखे पाटील यांनी भाविकांना आयोध्येच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आणि अक्षता दिल्या कारसेवक भूषण साठे,मिंदे गुरूजी,अभिजीत कुलकर्णी,योगेश मिश्रा संतोष खाबीया नितीन दिनकर यांचा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.राम मंदीर ट्रस्टच्या वतीने ना.विखे पाटील यांना सन्मानीत करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी राम मंदीराचे स्वप्न पूर्ण होत आहे.सर्वाच्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे.कारसेवकांचा सत्कार केला त्यांचे अभिनंदन करून त्यांचा संघर्ष केला प्राणांची आहूती दिली त्याचे समर्पण मंदीरासाठी महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील एक सुवर्ण क्षण ठरणार आहे.कोट्यावधी भारतीयांच्या भावना या विषयाशी जोडल्या गेल्या आहेत.नोव्हेंबर २०१९ सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला त्यानंतर मंदीर निर्माणाला प्रांरभ झाला.भव्य आशी मंदीराची वास्तू कमी कालावधीत उभी राहीली आहे.

मंदीर निर्माणात आधुनिक तंत्रज्ञान वापरले गेले त्यापेक्षाही या वास्तूशी भारतीच्या भावना गुंतल्या आहेत.त्याला माझ्या दृष्टिने अधिक महत्व आहे.आपण दिवाळी आणि पाडवा साजरा करतो.प्रत्येक सणाला वेगळे महत्व ऐतिहासिक क्षण साजरा करण्याचे प्रत्येक राम भक्ताचे कर्तव्य असल्याचे विखे पाटील म्हणाले.

मारूती मंदीरातही विखे पाटील यांनी भाविकांशी संवाद साधला.शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीकरीता निधी उपलब्ध करून देण्यात आला असून मंजूरीचे पत्र तातडीने समितीकडे सुपर्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.शहराच्या विकासाच्या दृष्टिने जे काही करता येणे शक्य आहे ते सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझे प्राधान्य असेल आशी ग्वाही त्यांनी दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!