कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबाद येथील प्रवरा विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालय येथे कोल्हार येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर प्रारंभ झाले.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी फत्याबादच्या सरपंच सौ. ज्ञानेश्वरी आठरे, रामदास देठे, संपतराव चितळकर, अशोक गागरे, लक्ष्मण चिंधे, पत्रकार संजय कोळसे, पांडुरंग आठरे, चांगदेव बेलकर, बाबासाहेब आठरे, विजय महाराज कुहिले, कोल्हार महाविद्यालयाचे प्राचार्य हरिभाऊ आहेर, प्रवरा विद्यानिकेतनचे प्राचार्य एस. टी. शेळके, चंद्रकांत ओहोळ, अनिल लबडे, उपप्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे, डॉ. प्रतिभा कानवडे, डॉ. प्रकाश पुलाटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण तुपे, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. संगीता धिमते आदी उपस्थित होते.
फत्याबाद येथे शुक्रवार दि.१९ जानेवारी ते गुरुवार दि. २५ जानेवारी या कालावधीत हे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर पार पडत आहे. शिबिर काळात विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रम राबविले जाणार असून या काळात योग, प्राणायाम, श्रमदान, व्याख्यानमाला, शिवार फेरी, ग्रामस्थ भेटी, समाज प्रबोधन, बौद्धिक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.