15.2 C
New York
Friday, October 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

दुर्गापूरच्या प्रवरा माध्यमिक विद्यालयात हळदी कुंकू कार्यक्रमातून माता जनजागृती

लोणी दि.२१( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या दुर्गापूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयात हळदी कुंकू आणि माता पालक मेळाव्यातून मुलीचे आरोग्य आणि आहार याविषयी जनजागृती करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात माता पालकांनी खूप मोठया संख्येने सहभाग घेतला. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.संध्या रोकडे यांनी किशोर वयातील मुलींची आईने कोणती काळजी घ्यावी, त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला आहार तसेच मुलींनी स्वतः चे संरक्षण कसे करावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षकास सौ.गायञी तांबे यांनी विद्यालयात घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली.यावेळी सौ.शितल जाधव यांनी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सुरु असलेल्या बालसंस्कार विभागाची माहीती देऊन मुली शिक्षण घेत असतांना विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून पुढे जावे. उपस्थित महिलांनी सुद्धा शाळेतील उपक्रमांचे कौतुक केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ,योगिता भालेराव,सौ.रफीया पठाण,सौ.स्वाती मनकर यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्तविक सौ.सविता जाधव यांनी केले तर सौ.मंगल भांगरे यांनीआभार मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!