14.4 C
New York
Saturday, October 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

प्रभू श्री राम मंदिर सोहळा आनंदोत्सवाने कोपरगाव बाजारपेठेत अनोखे चैतन्य,सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी केली खरेदी

कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा ) :- उद्या सोमवारी (२२ जानेवारी) अयोध्या नगरीमध्ये नव्याने बांधलेल्या भव्य श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यासाठी तमाम श्रीरामभक्त सज्ज झाले असून, आज रविवारी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगाव शहरातील बाजारपेठेत जाऊन श्रीराम मूर्ती, दिवे, पणत्या, आकाश कंदील, रांगोळी, भगव्या पताका, झेंडे अशा विविध वस्तूंची खरेदी केली. यावेळी त्यांनी व्यापारी व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांना व सर्व नागरिकांना श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या. देशासाठी ऐतिहासिक व गौरवास्पद असलेला हा अभूतपूर्व सोहळा सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी दिवाळी सणाप्रमाणे जल्लोषात व उत्साहात साजरा करावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले आहे.

यावेळी स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, पवित्र अयोध्येच्या भूमीत प्रभू श्रीरामांचे मंदिर उभारण्याची पाचशे वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. अनेक पिढ्यांनी पाहिलेले श्रीराम मंदिर उभारणीचे स्वप्न आज साकार होत असल्याचा आनंद होत आहे. या सुंदर व अतिभव्य श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उद्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्यदिव्य असा होणार आहे. आपण सारे भाग्यवान आहोत की, अयोध्येतील मंदिरात भगवान श्रीराम विराजमान होत असताना त्यांचे आपण साक्षीदार होत आहोत.

या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशात रामभक्तीची लाट पसरली असून, सर्वत्र राममय वातावरण निर्माण झाले आहे. देशात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या २२ जानेवारीला होत असलेल्या श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे आपल्या सर्वांना वर्षातून दुसऱ्यांदा दिवाळी साजरी करण्याचा योग आला आहे. हा समस्त श्रीराम भक्तांसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे घरोघरी सडा-रांगोळ्या काढून,दिवे-पणत्या, आकाश कंदील, श्रीराम ज्योत प्रज्वलित करून दीपावली सणासारखा दीपोत्सव साजरा करावा. गोडधोड जेवण करून आनंद साजरा करावा. यानिमित्ताने आपापल्या भागातील मंदिरांमध्ये रोषणाई करावी. भजन, कीर्तन, महाआरती, महाप्रसाद वाटपासह वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आयोजित करावेत. प्रभू श्रीराम हे करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असून, सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले आहे.

कोपरगाव शहरात नागरीकांना श्री राम बॅच, मफलर,झेंडे खरेदी करून नागरिकांना वाटप करत सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी या चैतन्यमय वातावरणाचा आनंद घेतला यावेळी नागरिकांनी देखील स्वयंउत्साहाने कोल्हे यांच्या समवेत जय श्री राम नारा देत वातावरण उल्हासित झाले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!