10.3 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

spot_img
spot_img

शरीर सौष्ठव स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी मनात जिद्द आणि प्रतिबद्धता, गांभीर्य आवश्यक – आ.आशुतोष काळे

कोळपेवाडी ( जनता आवाज वृत्तसेवा ): – शरीरसौष्ठवचे वेड अनेकांना असते. मात्र अतिशय कमी व्यक्ती शरीरसौष्ठव विकसित करण्यात यशस्वी होतात.त्यामुळे शरीर सौष्ठव मिळवायचे असेल तर मनात जिद्द, प्रतिबद्धता व गांभीर्य असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

तालुका बॉडी बिल्डिंग असोसिएशन आयोजित ‘छत्रपती श्री २०२४ टायटल’ उत्तर महाराष्ट्रस्तरीय भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचे आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, मानवी शरीराचा डौलदार व प्रमाणबध्द आकार म्हणजेच शरीर सौष्ठव.परंतु तरुण कमी वेळात पिळदार शरीर बनवण्यासाठी व शरीर सौष्ठव स्पर्धेत अव्वल येण्यासाठी तरुणांकडून स्टेरॉईडचा वापर होत आहे ही बाब चिंताजनक असून अनेकांना या औषधांच्या दुष्परिणामांची पुसटशी कल्पनाही नसते त्यामुळे जीम प्रशिक्षकांनी अशा तरुणांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. अनेक तरुण पीळदार शरीर बनवण्याचे स्वप्न बघतात आणि स्टेरॉइडच्या विळख्यात अडकतात. त्यामुळे पिळदार शरीर गरजेचे असले तरी सुद्रृढ शरीराचं स्वप्न उराशी बाळगावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी उपस्थित सहभागी स्पर्धकांना करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कोपरगाव तालुका बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे तालुकाध्यक्ष शरद खरात, उपाध्यक्ष ऋषिकेश आढाव, उपाध्यक्ष डॉ. दिपक पगारे, कौस्तुभ वाघे, प्रदीप कांबळे, बाळासाहेब घेर, अस्लम शेख, अमीन सय्यद, राहुल पहीलवान, आदींसह पोलीस उपनिरीक्षक बोबडे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, भरत मोरे, दिपक विसपुते, आकाश नागरे, मुन्ना मन्सूरी, दिपक वाजे, सहभागी स्पर्धक व नागरिक उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!