लोणी दि.२२( जनता आवाज वृत्तसेवा ):-अयोध्येत प्रभु राम मंदीर मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील शाळा, महाविद्यालय, तांत्रिक आणि अंताञिकच्या विद्यार्थ्यांनी गावोगावी शोभा यात्रा, संदेश याञेतून राम लल्लाचा जयघोष करत रामरक्षा, हनुमान चाळीसा पठण केले.
लोणी येथे प्रवरा कन्या विद्या मंदीर, प्रवरा गर्ल्स इंग्लिश मेडीअम स्कुल आणि पुण्यश्लोक आहील्याबाई विद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी सकाळी शोभा यात्रा, झांज पथक, लेझीम सह प्रभुरामचंद्राचा जयघोष करत हजारो कन्यांनी रामरक्षा आणि हनुमान चाळीसा पठण करत जयश्रीरामच्य घोषणा दिल्या. यावेळी संस्थेच्या शिक्षक संचालिका सौ. लिलावती सरोदे, प्राचार्या भारती कुमकर, सौ रेखा रत्नपारखी, प्राथामिक विभागाच्या सौ. सिमा बढे, विद्या घोरपडे, मुख्याध्यक निर्मळ आदीसह ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
प्रवरेच्या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून सर्वच शाळा महाविद्यालयात रामरक्षा, हनुमान चाळीसा हा उपक्रम मागील काही दिवसापासुन संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, मार्गदर्शनाखाली सुरू आहे. गावोगावी विद्यार्थ्यांनी प्रभुरामाचा जयघोष करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी लाडू प्रसादांचे ही वितरण करण्यात आहे.
शाळा, महाविद्यालयाबरोबरच प्रवरा परिसरातील लोणी, बाभळेश्वर, लोहगांव, चंद्रापूर, दुर्गापूर, दाढ आदी गावामध्ये भजन, किर्तन, महाप्रसादाचे आयोजन करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
लोणी बुद्रुक गावतील श्रीराम मंदीरात महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील तसेच सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी दर्शन घेतले.