लोणी दि.१६( जनता आवाज
वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या प्रा. अर्चना राजदेव यांची महाराष्ट्र शासनाच्या तंत्र शिक्षण विभागामार्फत युनिसेफच्या मास्टर ट्रेनर म्हणून निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र जाधव यांनी दिली आहे.
प्रा. राजदेव यांनी नुकतेच पुणे येथे जल संवर्धन आणि पाणीपातळी वाढवणे याबाबतचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. .युनिसेफ अंगर्तत विविध उपक्रमातून जल व्यवस्थापन आणि जल नियोजन यांवर ते आता उत्तर नगर जिल्ह्यातील इतर संस्थांना मार्गदर्शन करणार आहेत.
त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील , डॉ. सुजय विखे पाटील, सहसचिव श्री भारत घोगरे पाटील सहसचिव , डॉ. शिवानंद हिरेमठ,कॅम्प संचालक डॉ. बी. एम. पाटील, प्राचार्य डॉ. रवींद्र जाधव यांनी अभिनंदन केले आहे.