spot_img
spot_img

रामराज्य प्रमाणेच राज्य चालवून जनतेला सुख- समृद्ध करावे- तिलक डुंगरवाल.

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): –अयोध्येत ५०० वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने देशभरात आज जल्लोषचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

या कार्यक्रमानिमित्त आप व समर्थ ग्रुप च्या वतीने नेवासा रोड समर्थ चौक येथे रामध्वज उभारण्यात आला यावेळी मोठी रॅली काढून चौकामध्ये सडा, रांगोळी काढून, भगवे झेंडे, फुलांची सजावट, आतिशबाजी करत मोठ्या उत्साहात प्रभू श्रीरामचंद्र की जय जय श्रीराम, जय हनुमान अशा घोषणा देत मोठ्या आनंद उत्सवात कार्यक्रम साजरा करण्यात आला.या वेळी आप चे जिल्हाअध्यक्ष तिलक डुंगरवाल म्हणाले की ज्या पद्धतीने प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशामध्ये जल्लोषाचे आणि उत्सवाचे वातावरण दिसत आहे त्याचप्रमाणे भारतात रामराज्य ही आले पाहिजे राज्यकर्त्यांनी रामराज्य प्रमाणेच राज्य चालून जनतेला सुख समृद्ध करून देशात असंच उत्साही वातावरण ठेवून रामराज्य प्रमाणेच काम करावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली, यावेळी विकास डेंगळे म्हणाले देशामध्ये असाच आनंद उत्सव व प्रेम कायम राहो सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र आनंदाने रावे सर्व देश वासियांना प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी

तिलक डुंगरवाल, विकास डेगळे, राहुल रणपिसे, भरत डेगळे, श्रीधर कराळे पाटील, प्रशांत बागुल ,प्रवीण लगडे, सलीम शेख, अमोल नवघरे, ,डाॅ प्रवीण राठोड,,डाॅ सचिन थोरात, राज डेंगळे, भागवत बोंबले, देवराज मुळे ,मनोज बोंबले, मोहन तेलोरे , महेश कवठाळे, प्रवीण काळे ,गणेश भडांगे, शिवा मोरे, संदीप शिरसाट, मुबारक शेख, महबूब प्यारे, युवराज घोरपडे ,निलेश घोरपडे, सतीश सुलताने, अभिजीत राऊत, प्रसाद कटके, अलीम भाई शेख, विशाल शिरसाट, भागवत घुगे ,सुभाष भडांगे, शिवशंकर मोरे, नितीन मोरे ,गणेश पवार, प्रदीप ऊडे, राहुल राऊत, शुभम मालकर, गोकुळ जाधव, जयेश खर्डे, गणेश गवारे, विजय भवार, आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!