लोणी दि.१६( जनता आवाज वृत्तसेवा ):- लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमातील चार विद्यार्थ्यांची अजंता फार्मासिटिकल प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद या कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र जाधव यांनी दिली.
द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमातील संकेत कदम , रवींद्र गाडेकर , नारायण जाधव आणि महेंद्र वाघमोडे या चार विद्यार्थ्यांची अजंता फार्मासिटिकल प्रायव्हेट लिमिटेड या औषध निर्मितीत अग्रेसर असलेल्या कंपनीमध्ये निवड झाली आहे .सदर विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असून त्यांनी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की महाविद्यालयातील असलेल्या शैक्षणिक सुविधा आणि शिक्षकांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे नोकरीची संधी प्राप्त झालेली आहे.
संस्थेच्या माध्यमातून गुणवत्ता पुर्ण शिक्षणांसोबतचं करीअर मार्गदर्शन,माजी विद्यार्थ्याचे संघटन,विविध शैक्षणिक करार यामुळे शिक्षणांसोबत नोकरी हाच हेतू प्रवरेचा राहीला आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष व महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील ,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील , खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सहसचिव श्री भारत घोगरे पाटील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ,प्लेसमेंट विभागाचे प्रा. मनोज परजणे,कॅम्प संचालक डॉ. बी एम पाटील,प्राचार्य डॉ.रवींद्र जाधव ,प्रा, दत्तात्रय थोरात आणि प्रा. रूपाली कोते यांनी अभिनंदन केले आहे.