10.4 C
New York
Tuesday, November 26, 2024

Buy now

spot_img
spot_img

आता मरण आले तरी बेहत्तर, आरक्षण घेऊनच मागे परतणार – मनोज जरांगे पाटील,  सुप्यात भगव्या वादळाचे जंगी स्वागत, ५ लाख मोर्चेकरांचे शिरूरकडे प्रस्थान

पारनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):-शासनाला सात महिन्यांचा कालावधी देऊनही आरक्षण मिळत नसेल तर हा सकल मराठा समाजाचा अपमान आहे. वारंवार आंदोलने, उपोषण करून सरकारला फरक पडत नसेल तर आता मरण आले तरी बेहत्तर, आरक्षण घेऊनच मागे परतणार असल्याचे प्रतिपादन मराठी बांधवांचा शूर योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले. 

सुपा ता. पारनेर येथील सभेत मनोज जरांगे पाटील यांनी मराठी बांधवांना संबोधित केले यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व सकल मराठा समाजाच्या बांधवांना विनंती आहे की, मी तुमच्या जीवावर मुंबई कडे कुच करत आहे, माझ्या वर विश्वास ठेवा मी गुलाल घेऊनच घरी येईल विश्वास ठेवा. मी मरणाला भीत नाही, आता माघार नाही, सरकारने लय प्रयत्न केले पण मी मॅनेज होणार्यातला नाही. म्हणून त्यांचे फगाणा. आता मात्र मुंबईत भगवे वादळ निर्माण होणार यात शंका नाही. आर्धी लढाई आपण जिंकलो आहे आता फक्त थोडी लढाई बाकी आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, मी असेन किंवा नसेल तुम्ही मात्र एकत्र रहा का देत नाही आपण घेतल्याशिवाय राहणार नाही. असेही जरांगे पाटील म्हणाले.

सकल मराठा समाजाचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेला २० जानेवारी रोजी अंतरवली सराटी येथून सुरूवात झाली आहे आज सोमवार दि. २२ रोजी ऐतिहासिक पारनेर तालुक्यातील सुपा येथील सरदार श्रीमंत शाबुशिंग पवार मैदानावर हे भगवे वादळ धडकताच पारनेर श्रीगोंदा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने सुमारे १७० एकर क्षेत्रावर मराठी बांधवांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली. पारनेर सकल मराठा समाजाच्या वतीने लापशी व मसाला भात महाभोजनाचे तर श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील मराठी बांधवांच्या वतीने नाष्टा व भोजनासाठी सुमारे ५१ स्टॉल लावण्यात आले.यामध्ये केळी, शाबुदाना खिचडी, लापशी, मसाले भात, भाकरी, चपाती, मिरची,बेसण, दाळी आदींच्या गाड्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यादरम्यान संपूर्ण सुपा शहर भगवे झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा गर्दीचा महासागर उसळला होता. तर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज बांधवांचे २० जानेवारी पासुन जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथुन पदयात्रेने मुंबईला जाण्यासाठी प्रस्थान झाले आहे. या पदयात्रेत लाखो मराठा बांधव सहभागी झाले असुन ही पदयात्रा अंतरवली सराटी शाहागड, गेवराई, खरवंडी, पाथर्डी, तिसगाव, अहमदनगर, केडगाव, सुपा, शिरुर, वाघोली, शिवाजी नगर, पुणे, मुंबई एक्सप्रेस हायवे, लोणावळा, पनवेल, मुंबई अशा मार्गाने जाणार आहे. याचे नियोजन पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले.

मराठा मोर्चा हा अहमदनगर जिल्ह्यातून जात असुन नगर- पुणे महामार्गावरील सुपा परिसरात या मोर्चाचे आज दुपार चे भोजन सुपा येथे करण्यात आले. अतिशय नियोजनबद्ध मोर्चे करांच्या अन्न, पाणी, व इतर सोयीसुविधांची तयारी पूर्ण करण्यात आली. यामध्ये महिला पुरुष यांची वेगवेगळी व चार ते सहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. तसेच रस्त्याच्या दुतर्फा पाणी टॅंकर उभे करणे, मोर्चा बरोबरील टॅंकर रोड लगतच्या विहरी, बोरवेलवरुन भरण्याची सोय करण्यात आली, जेवणाची पाकीटे भरुन ती विभागून वाटप करण्यात आली. एकंदरीत सुपा येथील ऐतिहासिक नगरी भगवेमय झाले होते, “एक मराठा कोटी मराठा” घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यात्रेत मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाज सहभागी झाले असुन सुपा येथील मैदानावर जाहीर सभा घेण्यात आली. पुढील मुक्काम हा रांजणगाव गणपती ता. शिरूर जिल्हा पुणे येथे होणार असून सायंकाळी उशिरा शिरूरच्या दिशेने पदयात्रेचे प्रस्थान झाले.

आठ जेसीबीच्या सहाय्याने पुष्प वृष्टी 

ऐतिहासिक पारनेर तालुक्यात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील दाखल होताच सुमारे आठ जेसीबीच्या सहाय्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुष्प वृष्टी करण्यात आली.

तो फलक ठरला लक्षवेधी

 मनोज जरांगे पाटील यांचे सुपा येथील मैदानावर आगमन होण्यापूर्वी तरूण मराठा आंदोलकांच्या हातात ” आमदार – खासदार वाटत आहे चहा,

 हा तर मराठ्यांचा सोहळा आहे, 

जरा निरखून पहा ” हा फलक आंदोलन स्थळी लक्षवेधी ठरला.

 

पोलिसांचा मोठा बंदोबस्त 

दोन अप्पर पोलिस अधीक्षक, ८ पोलिस उपअधीक्षक, ३६ पोलिस निरीक्षक, ९८ सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक, ११८४ पुरुष पोलिस कर्मचारी, ५० महिला पोलिस कर्मचारी, ४३ वाहतूक शाखेचे कर्मचारी, दोन आरसीपी प्लाटून, एक यूआरटी प्लाटून, दोन एसआरपीएफ कंपन्या, एक सीआयएसएफ कंपनी, दोन बीडीडीएस पथके असा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!