लोणी दि.१५ ( जनता आवाज
वृत्तसेवा ):-राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ६३ व्या वाढदिवसा निमित्ताने आज सामाजिक उपक्रमांचे आयोजन प्रवरा परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. राज्यातील अनेक मान्यवरांनी मंत्री विखे पाटील यांना दुरध्वनी वरुन तसेच समाज माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
लोणी बुद्रूक येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांच्या उपस्थित दिव्यांग नागरीक तसेच विद्यार्थ्यांना विविध साहीत्य व आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात जेष्ठ संचालक ज्ञानदेव म्हस्के यांनी वृक्षारोपण केले. यावेळी सर्व संचालकांसह आधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना व प्रवरा शैक्षणिक संकुलातील शाळा, महाविद्यालयामध्ये वृक्षारोपणासह ग्रामस्थांनी शैक्षणिक साहीत्याचे वाटप केले. प्रवरा औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, प्रवरा तंत्रनिकेतन, पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय, प्रवरा अभियांत्