13.8 C
New York
Wednesday, October 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

नेवासा येथे स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती साजरी

नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा ):- नेवासा येथील नगर पंचायत चौकात आयोजित स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने बिट्टुभाऊ लष्करे शहर प्रमुख नितीन जगताप कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष नंदकुमार पाटील मुख्याधिकारी अंबादास गर्कल अंबादास लष्करे ह्या मान्यवरांनी स्व. ठाकरेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .

यावेळी बोलताना जगताप म्हणाले की आयोध्या येथे प्रभु श्रीरामाचे भव्य दिव्य स्वरूपात मंदिर व्यावे हि हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते त्यांनी त्यासाठी आपल्या भाषणातून प्रखर हिंदुत्ववादाची भुमिका मांडली. शिवसैनिकांन मध्ये स्वाभिमान जागृत करून अन्यायाविरुद्ध लढण्याचे प्रखर विचार दिले . काल रामलल्ला मंदिरात विराजमान झाले आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे श्रीराम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले. त्यांनी आम्हाला प्रखर हिंदुत्वाच्या विचारांचा वारसा असाच पुढे नेऊ. हिच खरी त्यांना जयंतीनिमित्त आदरांजली.

यावेळी सागर शिंदे ,अंबादास लष्करे,अशोक उपळकर, सचिन कदम, बिट्टू धनवटे ,गणेश झगरे,विकास लष्करे, अक्षय दाणे,मिलींद नागे,महेश पंडुरे , बालू जिरे,स्वप्नील मापारी,जयवंत मापारी,दिनेश व्यवहारे, स्वप्नील गांगुर्डे,नारायण लष्करे,जालू गवळी,दीपक धोत्रे,गोरख घुले , गणेश व्यवहारे, गणेश चांगले, रामदास इरले, रणजित सोनवणे,संदीप बेहळे उपस्थित होते .

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!