सात्रळ, दि.१५( जनता आवाज वृत्तसेवा ):- येथील लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (महसुल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री) यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करून साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. श्री. सुभाष जनाजी अंत्रे, मा. श्री. रंगनाथ पाटील दिघे, मा. श्री. जे. पी. अण्णा जोर्वेकर, मा. श्री. रमेश अण्णा पन्हाळे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. प्रभाकर डोंगरे, उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप, डॉ. जयश्री सिनगर, कार्यालयीन अधीक्षक श्री. विलास शिंदे, श्री. महेंद्र तांबे, प्राध्यापक-प्राध्यापिका व सेवक वृंद उपस्थित होते.