spot_img
spot_img

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

पाथरे (जनता आवाज वृत्तसेवा ):-श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पाथरे बु. तालुका राहाता येथे भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला ,सकाळी प्रमुख अतिथी स्थानिक स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष श्री. आबासाहेब पा. घोलप यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी उपसरपंच अरीफभाई शेख, पवन पा. कडू, सोपान घोलप, चित्राताई आमरे, मा. भाऊसाहेब बाबुराव पा. घोलप, प्राचार्य श्री. एन बी तांबे सर,उपप्राचार्य सौ. वाणी मॅडम, उच्च माध्यमिक विभाग समन्वयक श्री. हारदे सर,माध्यमिक विभाग समन्वयक श्री. पारखे सर प्राथमिक विभाग समन्वयक श्री. घुगे सर, क्रीडा शिक्षक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद, शिक्षणप्रेमी नागरिक, विद्यार्थी- विद्यार्थिनी, ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पहिली ते बारावीचे  विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केला सर्व मान्यवर अतिथी ,पालक व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना बक्षीसे दिली पालकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाला दाद दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. पारखे सर यांनी केले तर आभार श्री. घुगे सर यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कोराळे सर, श्रीमती.घोलप मॅडम व विद्यार्थिनींनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून उपप्राचार्य सौ. वाणी मॅडम यांनी कामकाज पाहिले ,कार्यक्रमाचे सर्व नियोजन क्रीडा शिक्षक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद सर यांनी केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!