spot_img
spot_img

सौ.कडू यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

गळनिंब( जनता आवाज वृत्तसेवा ):- कोल्हार ता.राहता येथील न्यु.इंग्लिश स्कूलच्या उपशिक्षिका सौ कडू सविता संपत यांना स्वर्गीय शंकर नाना खर्डे पाटील सामाजिक सेवा संघटनेच्या वतीने दिला जाणारा २०२४ चा आदर्श शिक्षिका पुरस्कार नुकताच शंकर नाना खडे पाटील सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक तथा कोल्हार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अड.सुरेंद्र पा. खर्डे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष अजित मोरे, पांडुरंग देवकर, बालरोग तज्ञ डॉक्टर सुनील खर्डे, सकाळचे सुहास वैद्य, काळूराम बोरुडे मुख्यध्यापक श्री वाघमारे सर सुपरवायझर सौ आंधळे मॅडम आदी उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री अरुण कडू पाटील तसेच किरण पा कडू मित्रमंडळ यांनी अभिनंदन केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!