श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर शहरात समोर आलेला असून एका तरुणाने खाजगी सावकाराच्या वसुलीच्या त्रासाला कंटाळून अखेर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे . नगर जिल्ह्यात अवैध सावकारीने धुमाकूळ घातलेला असून शेतकरी अन तरुणांचे जगणे सावकारांनी अवघड केलेले आहे .
उपलब्ध माहितीनुसार , तेजस बोराडे असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नाव असून त्याने शहरातील वार्ड क्रमांक सातमध्ये दळवी वस्ती परिसरात राहत असलेल्या एका सावकाराकडून 2021 साली एक लाख पन्नास हजार रुपये 15 टक्के व्याजाने घेतले होते. कर्जापोटी त्याने सावकाराला रक्कम परत देखील केलेली आहे मात्र त्याने परत केलेली रक्कम ही फक्त व्याजाची रक्कम आहे अन मूळ रक्कम परत दिलेली नाही म्हणून सावकार त्याला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता . सातत्याने त्याला गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून त्रास देण्यात आल्याने त्याने हा प्रकार केल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. श्रीरामपूर शहर मध्ये व्यवसायाचे नावाखाली सावकारकीचे व्यवसाय करणारे लोक जास्त आहेत.