संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):-ब्रिटीशांच्या तावडीतून देशाला खऱ्या अर्थाने वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षसोडून दुसऱ्या कुठल्याच राजकीय पक्षाने काम केले नाही.काँग्रेसमुळेच देशाचीलोकशाही अन संविधान अबाधित होते. मात्र केंद्रात असलेले सध्याचे भाजपचे सरकार लोक शाहीच्या विरोधात आहे. त्यामुळे देशाची लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी एक होऊन लढा देणे गरजेचे आहे नाहीतर पुन्हा एकदा देशाची सत्ता नरेंद्र मोदींच्या हातात सत्ता दिली तर देशाची लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही अशी भीती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्ध रामय्या यांनी व्यक्त केली
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरितक्रांतीचे प्रणेते अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती निमित्ताने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते ज्येष्ठ नेते उल्हास पवार, जळगाव येथील जैन उद्योग समूहाचे प्रमुख अशोक जैन,आणि कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्याचे आमदार पी एन पाटील यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. तर व्यासपीठावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, कर्नाटकचे मंत्री एच के पाटील, माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते आ जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे नेते माजी मंत्री भास्कर जाधव, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते माजी मंत्री आ बाळासाहेब थोरात, माजीमंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री डॉ विश्वजीत कदम , आ रवींद्र धंगेकर, आ झिशन सिद्दकी ,आ सत्यजित तांबे, लहू कानडे आ हिरामण खोसकर ,आ शिरीष चौधरी ,आ राजेश राठोड माजी आ डॉ सुधीर तांबे, माजी. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, सौ कांचन थोरात, सौ दुर्गा तांबे, बाजीराव खेमनर ,रणजीत देशमुख, इंद्रजीत थोरात, , माजी आमदार मोहन जोशी, माजी आ नामदेव पवार, आदी मान्यवर उपस्थित होते
मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संपूर्ण राज्यात जिल्ह्यात आणि संगमनेर मध्ये सहकार वाढवला आणि टिकवला परंतु सध्या केंद्रातील सहकार खातेअमित शहा यांच्याकडे असल्यामुळे केंद्रसरकार राज्याच्या सहकार खात्यात ढवळा ढवळ करत आहे त्यामुळे केंद्र सरकारने राज्य सरकारच्या कुठल्याच क्षेत्रात हस्तक्षेप करू नये. अशी अपेक्षा व्यक्त करत ते म्हणाले की केंद्रातील भाजपचे मोदी सरकारने शेतकर्यांच्या विरोधी असणारे कायदे आण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शेतकर्यांच्या आंदोलनापुढे मात्र केंद्र सरकारला झुकावे लागले त्यामुळे या सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन लढा देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले
भाजपा वसाहतवाद योजना आणत आहे ही देशाच्या दृष्टीने अत्यंत घातक सहकार चळवळ ग्रामीण भागाला सशक्त बनवत आहे . मात्र केंद्र सरकार सहकार चळवळ मोडीत काढून पाहत आहे.सध्या राज्याचे सर्व अधिकार केंद्र सरकारने ताब्यात घेतले आहेत. भारतीय जनता पार्टी ही भ्रष्ट पार्टी असून कर्नाटक मध्ये 40% कमिशन घेत होते. त्यामुळे जनतेने त्यांचा मोठा पराभव केला.कर्नाटकात काँग्रेसने पाच कलमी विकास योजना जाहीर केल्या अन त्याची अंमलबजावणी करण्याची हमी दिली त्यामुळे कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आली आहे . महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसने विधानसभा निवडणुकी पूर्वी पाचकलमी विकास योजना जाहीर करावी आणि सत्तेवर आल्यानंतर त्या योजनांची अंमलबजावनी करावी असा सल्ला त्यांनी काँग्रेस नेत्यांना दिला.
शिवसेनेचे उपनेते माजी मंत्री भास्कर जाधव म्हणाले की देशात एकनिष्ठता राहिली नसून सत्तेसाठी लोक पक्ष बदलत आहेत. देशांमध्ये दोघेजण हुकूमशाहीतून देश हातात घेत आहेत .खोटा इतिहास सांगत आहेत. काहीजण देशाला 2014 ला स्वातंत्र्य मिळाले असे म्हणत आहे. मग 1947 ला स्वातंत्र्य मिळाले ते काय होते. ब्रिटिशांविरुद्ध लढताना त्यावेळी अनेकांनी प्राण्यांची आहुती दिली. तुरुंग वास भोगला. त्यांची तुम्ही थट्टा करत आहात असा टोलाही जाधव यांनी सत्ता धारी भाजपला लगावला
माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आपण कायम गांधीवादी विचार जपला असून जिवंत आहे तोपर्यंत हा विचार आपण सोडणार नाही. देशाचा कोणताही पंतप्रधान दुसऱ्या देशात जातो तेव्हा महात्मा गांधी यांचेच नाव सांगतो. मी ही कायम निष्ठा जपली आहे. बापाला घरी बसा असे सांगणारे काही लोक आहेत. शरद पवार हे कायम पुरोगामी विचारांची ताकद राहिली असून मरण आहे तोपर्यंत मी या विचारांची बांधील असल्याचे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
माजी मंत्री आमदार थोरात म्हणाले की, हे वर्ष सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची जन्मशताब्दी वर्ष असून त्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. एकनिष्ठता व पुरोगामी विचारांचे पाईक असणारे सर्व मान्यवर राज्यभरातून या ठिकाणी उपस्थित असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले
प्रस्ताविक काँग्रेसविधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केलेसूत्रसंचालन नामदेव कांहडळ यांनी केले तर आभार एकविरा फाउंडेशनचे अध्यक्ष जयश्री थोरात यांनी मानले
हरित क्रांतीचे प्रणेते अण्णासाहेब शिंदे यांच्या नावाने अमृतवाहिनी शेती शिक्षण व विकास संस्थेच्या वतीने जळगाव येथील जैन उद्योग समूहाचे प्रमुख अशोक जैन यांना एक लाख रुपये देण्यात आले मात्र त्यांनी त्या लाख रुपयात जैनउद्योग समूहाचे १० लाखाची भर टाकून ११ लाख रुपये काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुपूर्त करत या रकमेतून शेतकऱ्यांना विविध योजना राबविण्यासाठी खर्च करा असे जैन उद्योग समूहाचे प्रमुख अशोक जैन यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले.



