टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा ):- अबॅकस क्लासमुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा व्यायाम होवून बौधिक क्षमता वाढते तसेच विद्यार्थ्याची एकाग्रता, स्मरणशक्ती व आत्मविश्वास वाढ होत असल्याने पालकांनी पाल्यांनाअबॅकस क्लास लावून आपल्या पाल्याचे भवितव्य उज्वल करावे असे आवाहन डाॅ. नितीन मगर यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या वतीने टाकळीभान ग्रामपंचायतच्या स्व. गोविंदराव आदिक सभागृहात नॅशनल लेवल ऑनलाईन स्पर्धेतील विजेत्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी डाॅ. नितीन मगर बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून बाबासाहेब लोंढे, पत्रकार चंद्रकांत लांडगे, विजय देवळालकर, बापुसाहेब नवले, वैशाली लोंढे, दिपाली पुंड, सचिन माने, शंकरराव पवार उपस्थित होते.
यावेळी बोलतांना वैशाली लोंढे म्हणाल्या की, अबॅकस क्लासमुळे विद्यार्थ्यांचा बौधिक विकास होतो, डाव्या व उजव्या मेंदुची कार्यक्षमता वाढून आकलनशक्ती वाढते त्यामुळे विद्यार्थी गणिते कॅल्क्युलेटरच्या स्पीडने सोडवितात त्यामुळे त्यांचे गणित व इंग्लिश चांगले होत असल्याचे सांगून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बापूसाहेब नवले यांनी मनोगत व्यक्त केले. क्लासचे शिक्षक अजित म्हस्के यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी शिक्षक म्हस्के यांचा पालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषीक देण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वरा बोरूडे, गणेश दाभाडे व निरंजन नाईक यांनी केले.या कार्यक्रमास पालक मोठ्या संखेने उपस्थित होते.




