नाशिक (जनता आवाज वृत्तसेवा):-अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा येत्या 17 व 18 जुन 2023 रोजी उपपीठ उत्तर महाराष्ट्र,रामशेज किल्ल्याजवळ, आशेवाडी, नाशिक येथे भव्य समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा संपन्न होणार आहे. अध्यात्म ,विज्ञान व व्यवहार या त्रिसुत्रीची सांगड घालून जीवन कसे जगावे? या बाबत मार्गदर्शन प.पु.जगद्गुरुंच्या अमृत वाणीतून सर्वांना लाभणार आहे.
त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मुलन, जीवनात येणाऱ्या अनेक समस्या व त्यांना कसे सामोरे जावे यावरही सखोल मार्गदर्शन होणार असून सदर कार्यक्रम हा दोन्ही दिवस सकाळी नऊ वाजल्यापासून चालू होत आहे.येणाऱ्या भाविकांच्या सर्व सोयीच्या दृष्टीने तसेच पावसापासून संरक्षण व्हावे अशा दृष्टीने भव्य दिव्य मंडप उभारणीचे काम युद्ध पातळीवर चालू आहे.तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जगद्गुरुश्री येत आहेत म्हणून सर्व भाविकांच्या मनात अतिशय उत्साहाचे वातावरण असून माऊलींच्या दर्शनाची व त्यांना डोळे भरून पाहण्याची सर्वांना आस लागली आहे.
गावोगाव तळागाळात प्रचंड मोठ्या प्रमाणात जोरदार प्रचार प्रसार करून सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून प.पू.जगद्गुरुश्रींच्या प्रवचनाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान, उपपीठ उत्तर महाराष्ट्र(नाशिक) यांच्या वतीने करण्यात येत आहे.