नगर( जनता आवाज वृत्तसेवा ): – शिवसेना प्रमुख हिंदूहृदय सम्राट आदरणीय स्व. बाळासाहेब ठाकरे व हिंदूधर्मरक्षक स्व. अनिलभैय्या राठोड साहेब यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे व युवासेना प्रमुख आदरणीय आदित्य साहेब ठाकरे यांध्या आदेशान्वये ऋषिकेश सामल अहिल्यानगर शहराच्या युवासेना उपशहर प्रमुखपदी निवड करण्यात आली.
नक्षत्र लॉन्स येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळावा मध्ये खासदार संजय राऊत यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी युवा सेना सहसचिव विक्रम राठोड तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले की, हिंदुत्वाशी आणि मराठी माणसाशी एक अतूट नात शिवसेना प्रमुखांनी सर्वाशी कुटुंब प्रमाणे जोडले म्हणून त्यांना हिंदूहृदय सम्राट म्हणून गौरविले गेले. शिवसेना प्रमुखांच्या आदेशाने आज संघटना आपल्या सारख्या कार्यकत्यांच्या बळावर उभी राहिली आहे. आपल्यातला धगधगता हिंदुत्वाचा बाणा हिंदुत्वाची पताका घेऊन समाजाला, युवाशक्तीला संघटनाच्या माध्यमातून यशस्वीरीत्या पुढे न्यायचा आहे.
युवा सेना सहसचिव विक्रम राठोड म्हणाले की ऋषिकेश सामल यांचे पद्मशाली समाजामध्ये मोठे कार्य आहे. तरुणांसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. गरजूंच्या मदतीसाठी ते कायम तत्पर असतात. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांची युवा सेना उपशहर प्रमुख पदी निवड निवड करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
यावेळी ऋषिकेश सामल म्हणाले अपेक्षा न ठेवता आपण केलेल्या काम हे आपल्याला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मोठी संधी देत असते. मला मिळालेले हे पद मी केलेल्या कामांची पावती आहे. या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी आपण प्रयत्न करणार तसेच युवा सेनेतील सर्वांना बरोबर घेऊन आपले कार्य यापुढे सुरू ठेवून व पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.




