टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा ) :-श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे महसूल व वन विभागाच्या वतीने मंडळाधिकारी कार्यालयात आज दि.२९ जानेवारी २०२४ रोजी मराठा कुणबी, कुणबी मराठा प्रमाण पत्र वाटप व ऑनलाईन अर्ज नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ६२ लोकांची कुणबी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात आली.
मराठा समाजातील कुणबी नोंदी वंशावळ असणार्या समाजबांधवाना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी शासनाच्या वतीने आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टाकळीभान, घुमनदेव, कमालपूर, माळवाडगाव, खोकर, वडाळा महादेव, भोकर, भामाठाण, खानापूर, मुठेवाडगाव या गावातील मराठा समाजबांधवांना ज्यांचे १९६७ पुर्वीच्या कुणबी(वंशावळ) नोंदी आहे. अशा अर्जदारांनी कुणबी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी टाकळीभान मंडळ येथील मंडाळाधिकारी व तलाठी कार्यालयासमोर आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी शासनाच्यावतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संबधित वरील गावांमधून एकूण ६२ कुणबी प्रमाण पत्रांसाठी आॅनलाईन अर्जाची नोंदणी करण्यात आल्याची माहीती मंडळाधिकारी प्रशांत ओहळ यांनी दिली. संबधित ६२ नोंदणी झालेल्या अर्जाची पडताळणी होवून संबधित अर्जदारांना सात दिवसात प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे ओहळ यांनी यावेळी सांगीतले.
या शिबिरामध्ये ज्यांच्याकडे १९६७ पुर्वीचे कुणबी पुरावे(वंशावळ)उपल्ब्ध होती अशा अर्जदारांचे अर्ज ऑनलाईन दाखल करण्यात आले. मात्र बहूतांशी समाज बांधवांकडे कुणबी नोंदी अथवा पुरावे नाहीत असेही लोक या शिबिराच्या ठिकाणी आले होते.
या शिबिरासाठी मंडाधिकारी प्रशांत ओहळ, तलाठी कचेश्वर भडकवाल, संतोष लचोरे, घोरपडे, संदीप जाधव, सेतूचालक प्रशांत थोरात, बाळासाहेब रणनवरे, कोतवाल सदा रणनवरे आदी प्रयत्नशिल होते.
टाकळीभान मंडळ येथे टाकळीभानसह ९ गावातील समाज बांधवासाठी उपसरपंच कान्हा खंडागळे यांच्या ताई प्रतिष्ठाणच्या वतीने मंडप टाकण्यात आला होता. तसेच नाष्टा व पाण्याच्या जारची व्यवस्था करण्यात आली होती. समाज बांधवासाठी जे योगदान देता येईल ते देण्याचा आपण प्रयत्न करू व संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील जो आदेश देतील त्याप्रमाणे रूपरेषा ठरवून योगदान देवू असे मत उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी यावेळी व्यक्त केले.