पाथर्डी ( जनता आवाज वृत्तसेवा ):- पाथर्डी तालुक्यातील सातवड येथे एक कार्यक्रमादरम्यान माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी नागरिकांना साखर वाटप कार्यक्रमादरम्यान यांनी जनतेला संबोधित करते असताना राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लावला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाचा आरक्षण देण्याचा प्रश्न प्रलंबित राहिला होता. हा दिलेला शब्द राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात शासनाने पाळला. महायुतीच्या सरकारने आतांपर्यंत सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाचे तंतोतंत पालन केले असून राज्यातील व केंद्रातील सरकार शेतकरी हिताचे असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे.
पाथर्डी तालुक्यातील सातवड येथे नागरिकांना साखर वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी कर्डिले बोलत होते. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून धनश्रीताई विखे पाटील, महंत शंकर महाराज ससे, माजी नगराध्यक्ष अभयराव आव्हाड, माजी जि.प. सदस्य पुरुषोत्तम आठरे, मार्केट कमिटीचे अध्यक्ष सुभाष बर्डे, माजी पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, मिरी तिसगाव नळ योजनेचे क अध्यक्ष एकनाथ आटकर, मार्केट ल 2 कमिटीचे संचालक वैभव खलाटे, अ पोपटराव कराळे, सुरेश चव्हाण, भाजप नेते नानासाहेब गागरे, युवानेते बंडू पाठक, कुशल भापसे, डॉक्टर नंदकिशोर नरसाळे, माजी सरपंच कानिफ पाठक, संभाजी वाघ, विनायक सरोदे, पोपट पाठक, महादेव नजन यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी धनश्रीताई विखे म्हणाल्या पाचशे वर्षापासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित राहिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अयोध्येमध्ये श्रीरामांचे मंदिर उभे राहिले व रामलल्लांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा देखील झाली. ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे म्हणत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून मागील रखडलेला विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम करण्यात आले आहे.