लोणी दि. ३०( जनता आवाज वृत्तसेवा ):-अभिनय हे सर्वस्व मानत करोडो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे अशोक सराफ हे साक्षात अभिनय सम्राट आहेत, त्यांची महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी निवड होणे हे महाराष्ट्रासाठी भूषणावह असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना शासनाच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे मनस्वी अभिनंदन करीत असल्याचे संदेशात म्हटले आहे..अशोक सराफ यांना २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.
मराठी नाट्य सृष्टीतून अशोक सराफ यांनी कलाक्षेत्रात पदार्पण केले.आपल्या अंगीभूत आशा कला गुणांनी अशोक सराफ यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटामधून आपल्या दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.विनोदाचे टायमिंग साधणारा कलावंत म्हणून कालक्षेत्रात त्यांनी निर्माण केलेली ओळख आणि मराठी रंगभूमी तसेच चित्रपट सृष्टीमध्ये दिलेल्या योगदानाचा गौरव महाराष्ट्र भूषण पुरस्काराने झाला असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.