23.1 C
New York
Thursday, August 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

प्रामाणिकपणा आणि कष्ट हे दोन हिरे माझ्याकडे -विवेकभैय्या कोल्हे     

कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा ) :- जीवनात मोठे होण्याचे स्वप्न पहा त्यासाठी संकटांवर मात करण्याची जिद्द ठेवा.मोठे स्वप्न पहायला कसलाही टॅक्स लागत नाही ते पूर्ण करण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी असावी लागते. आपले ध्येय व स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने सातत्यपूर्ण परिश्रम करा.आपल्या अंगी प्रामाणिकपणा आणि कष्ट असेल व त्यात सातत्य ठेवले तर यश तुमचेच आहे, असा यशाचा मुलमंत्र सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य विवेकभैय्या कोल्हे यांनी तरुणाईला दिला. 

कोपरगाव येथील श्री सदगुरू गंगागीर महाराज विज्ञान, गौतम कला व संजीवनी वाणिज्य महाविद्यालयात बीबीए आणि आयक्यूएसी विभागाच्या वतीने आयोजित उद्योजकता विकास मंचचे उद्घाटन व ‘यशस्वी उद्योजक कसे व्हावे’ या विषयावरील चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. आर. आर. सानप, प्रा. एन. बी. साळवे, प्रा. एम. बी. गवारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या चर्चासत्रात विवेकभैय्या कोल्हे यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींशी मुक्तपणे संवाद साधला. यशस्वी उद्योजक होण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन‎ जीवनात अभ्यासासोबतच‎ आपल्यातील नाविन्यता असणारे गुण जोपासले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्षमता ओळखून समरसतेने आवडीचे क्षेत्र निवडले तर त्यांना पुढील कालावधीत ध्येय साध्य होतात. सैनिक सीमेवर राहून देशसेवा करत असतात, त्याप्रमाणे आपणही आपल्या परिसरात राहून आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केले तर ते देशसेवा केल्यासारखेच आहे.

दैनंदिन व्यस्त जीवनात वेळात वेळ काढून आपण तरुणांमध्ये राहून त्यांचे प्रश्न समजून घेत असतो. ग्रामीण भागातील तरुणांनी कसलाही न्यूनगंड न बाळगता उद्योग-व्यवसाय सुरु करण्यासाठी पुढे आले पाहिजे. आपल्याकडे उद्योग क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहेत. उपलब्ध संधीचा लाभ घेत अनेकांनी औद्योगिक क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. अनेक मोठी उदाहरणे आहेत त्यांचे आदर्श डोळ्यांसमोर ठेवून तरुणांनी मोठा उद्योग-व्यवसाय सुरू करून नावलौकिक मिळवावा. ग्रामीण भागात यशस्वी उद्योजक तयार व्हावेत, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.आपल्या भागातही अनेक प्रतिकूल परिस्थितीत पुढे आलेले उदाहरणे आहेत तसेच सर्वांनी जिद्द आणि प्रयत्न यातून यश मिळवावे यासाठी मी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, नव उद्योजकांना मदत करू, अशी ग्वाही विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली.

विवेकभैय्या कोल्हे यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरण मिळेल, असे प्राचार्य डॉ. आर. आर. सानप यांनी सांगितले.

या चर्चासत्रात अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे आपले विचार मांडले. प्रा. एन. बी. साळवे यांनी प्रास्ताविक तर प्राचार्य आर. आर. सानप यांनी स्वागत केले. याप्रसंगी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!