लोणी दि.३०( जनता आवाज वृत्तसेवा ):-विद्यार्थ्यानी जीवनात प्रॅक्टीकली होण्याची गरज आहे.संवाद कौशल्य यशाचा अतिशय महत्वपूर्ण यशाचा मार्ग आहे. व्यक्तीमत्व हे समृद्ध होण्यासाठी वत्कृत्व आणि वादविवाद स्पर्धांना विशेष महत्व असून पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा जीवनपट हा तरूणांसाठी प्रेरणा देणारा आहे.प्रवरेतून घडणारा विद्यार्थी आदर्श ठरत असतो असे प्रतिपादन साहीत्यिक आणि पुण्यनगरीचे उपसंपादक विकास अंञे यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन रौप्य करंडक वादविवाद स्पर्धाच्या उद्याटन प्रसंगी विकास अंञे बोलत होते. यावर्षी G 20 च्या अध्यपदामुळे देशाची महासत्तेकडे वाटचाल सुरु झाली हा प्रस्ताव वादविवादसाठी ठेवला आहे.यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील,विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलास नाना तांबे, संस्थेचे सह सचिव भारत घोगरे,प्राचार्य डाॅ.आर,ए. पवार ,स्पर्धेचे कार्यध्यक्ष डॉ. शांताराम चौधरी, डाॅ.बी.डी.रणपिसे, डाॅ.अनिल वाबळे,डाॅ.राजेंद्र सलालकर आदी उपस्थित होते.
यावेळी विकास अंञे म्हणाले, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी दुरदृष्टीतून सहकारी चळवळीतून ग्रामीण विकास साद्य केला. त्याचे विचार समजून घेत पुढे जात असतांना वादविवाद स्पर्धेतून आपण प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान मिळविणे गरजेचे आहे.
तरुणाई मार्गदर्शन करतांना आपल्या आवडीनुसार करिअर करा.विविध महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी यातून त्यांचे विचार समजून घेत ते जपा.सोशल मिडीयाचा वापर करतांना सकात्मक करावा असे सांगितले.जय-पराजय हा होत असतो पण यातूनच आपली जडण घडत असते असे सांगुन या स्पर्धेच्या आयोजनाचे कौतुक केले.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शानीलीताई विखे पाटील म्हणाल्या,प्रवरेचा माझी विद्यार्थी हा व्यासपीठांवर घेऊन मार्गदर्शन करतो हाच प्रवरेच्या शिक्षणांचा आदर्श आहे.आजच्या स्पर्धेतून विषयांचे मंथन होऊन यांतून देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी महत्वपुर्ण ठरले.असे सांगून आपल्या मतावर ठाम रहा.असा संदेश दिला.
प्रस्तावाची भूमिका या स्पर्धेचे कार्याध्यक्ष डॉ. शांताराम चौधरी यांनी विशद करून स्पर्धेचे हे गौरवशाली बेचाळीसावे वर्ष आहे तसेच महाराष्ट्रात ही एक मानाची वाढदिवस स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. वैशाली मुरादे यांनी तर आभार प्राचार्य डॉ.आर.ए. पवार यांनी मानले.