नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ):-चला हवा येऊ द्या फेम डॉ निलेश साबळे यांचीप्रमुख उपस्थिती.नेवासा तालुक्यातसह अहमदनगर जिल्हा व जिल्ह्या बाहेरही गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रसिध्द असलेल्या मुळा एज्युकेशन सोसायटी सोनईचा ४५ वर्धापन ३१ जाने २०२४ ते ४ फेब्रु २०२४ या ५ दिवस मुळा एज्युकेशन सोसा सोनई येथेविविध कार्यक्रमानी साजरा केला जाणार आहे
३१ जाने २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता चला हवा येऊ द्या फेम डॉ निलेश साबळे यांचा कार्यक्रम होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक मा खा यशवंतरावजी गडाख असणार आहेत.
विविध सांस्कृतिक कार्यक्रम,प्रेरणादायी व्यख्याने,विविध महाविद्यालयांचे संस्कृतीक स्नेहसंमेलन, लाइव्ह कॉन्सर्ट,फटाक्याची आतिषबाजीअसे भरगच्च आनंद देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिकांसाठी मुळा एज्युकेशन सोसा सोनईच्या वतीने ठेवण्यात आले आहे.
या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी केले आहे.