14.4 C
New York
Saturday, October 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

नगर मनमाड रस्ता दुरुस्त कृती समितीच्या लढ्याला यश कृती समितीच्या सदस्यांचा नागरिकांकडून सत्कार

राहुरी जनता आवाज वृत्तसेवा ) :– नगर ते शिर्डी रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून नगर मनमाड रस्ता दुरुस्त कृती समितीच्या वतीने वेळोवेळी आवाज उठवत आंदोलन करून प्रशासनास रस्ता दुरुस्त करण्यासाठी पाठपुरवा केला व त्या प्रयत्नांना यश मिळाल्या बद्दल जोगेश्वरी आखाडा येथे काका हॉटेल येथे येवले आखाडा व जोगेश्वरी आखाडा येथिल व्यावसायिक, नागरिकांनी कृती समितीच्या सदस्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होतो.

या प्रसंगी ढोकणे यांनी प्रास्ताविक करतांना म्हणाले कि रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या लढ्यामुळे नगर रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात झाली आहे.जोगेश्वरी आखाडा,येवले आखाडा परिसरातील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक अपघात झाले आहेत,अपघातात अनेक प्रवाशांचे मृत्यू देखील झालेले आहेत.

या प्रसंगी रस्ता दुरुस्ती कृती समितीचे वसंत कदम म्हणाले कि राहता,कोल्हार,राहुरी परिसरातील अनेक युवक रोजगारासाठी नगर येथे रोज नगर शिर्डी रस्त्यावरून प्रवास करून जातात.प्रवासा दरम्यान रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघात होवून अनेक तरुणांचे अपघात होवून प्राण गेलेले आहेत.याची दखल घेत २०१९ साला पासून रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून कृती समितीची स्थापना करून अनेक आंदोलने करण्यात आलेले आहेत.

या प्रसंगी रस्ता दुरुस्त कृती समितीचे देवेंद्र लांबे म्हणाले कि,नागरी सत्कारामुळे रस्तादुरुस्त कृती समितीची जबाबदारी आणखी वाढली आहे.रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून आंदोलन करत असतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.परंतु कृती समितीच्या सदस्यांचा व नागरिकांच्या पाठबळामुळे लढण्याचे बळ मिळाले.नगर दक्षिणचे खा.सुजय विखे व शिर्डीचे खा.सदाशिव लोखंडे यांच्या सहकार्यामुळे कृती समितीच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

या प्रसंगी सुनील विश्वासराव,संतोष चोळके,अभिजित आहेर यांनी मनोगत व्यक्त केले.आभार किशोर गोसावी यांनी मानले.या कार्यक्रमास हसन सय्यद,सतीश घुले,मनोज कदम,मनोज गावडे,श्रीकांत शर्मा,प्रमोद विधाटे,सचिन कदम,नितीन मोरे,प्रसाद कदम,बाबासाहेब खांदे,अशोक तनपुरे,राहुल गोसावी,महेंद्र शेळके,काका बिडवे,रंगनाथ येवले,महेश बनकर,किशोर बेलन, सचिन जाधव,आदेश जाधव,अमोल धनवटे,दत्तात्रय धनवटे आदी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!