सोलापूर (जनता आवाज वृत्तसेवा):- सध्या राज्यांमध्ये लव जिहाद, अल्पवयीन मुलींना फसवणूक करून आपल्या जाळ्यात ओढणे यासारखे प्रकार अनेक घडत आहे. याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्या मध्ये सेवानिवृत्त डीवायएसपी यांनी आपल्या सुनेवर शारीरिक अत्याचार केल्याचं उघडकीस आले आहे. सेवानिवृत्त डीवायएसपी विरुद्ध विजापूर नाका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सुनेवर शारीरिक अत्याचार करणारा सासऱ्यावर गुन्हा दाखल
सेवानिवृत्त डीवायएसपीचा शिक्षक असलेल्या मुलाबरोबर पीडितेचा गेल्यावर्षी रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला. पीडिता ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्यामुळे तिला महाविद्यालयात तिचे सासरे सेवानिवृत्त डीवायएसपी हे कधी चार चाकी गाडीत, तर दुचाकी गाडीवरून सोडत होते.
ऑगस्ट 2022 मध्ये सेवानिवृत्त डीवायएसपी यांनी घरात एकट्याच असलेल्या सुनेवर अत्याचार केला व याबाबत कुणालाही काहीही सांगितल्यास घरातून हाकलून देण्याची धमकी दिली. त्यामुळे ही बाब पिडीत सुनेने कुणालाही सांगितलेली नाही. याचा गैरफायदा घेत सासर्याने पुन्हा सुनेवर अत्याचार केला. त्यामुळे पिडीत सुनेने ही बाब आपल्या पतीला सांगितली असता तिच्या पतीने तिलाच मारहाण करून माहेरी हाकलून दिले. त्यामुळे माहेरी राहात असलेल्या पिडीतेला सासरच्या मंडळींनी पुन्हा नांदविण्यास नेले नाही. अशी नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक हनपुडे -पाटील करीत आहेत.