लोणी दि.२( जनता आवाज वृत्तसेवा ):-राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावते विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपावी आणि ग्रामस्वच्छतेच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा असे प्रतिपादन चिंचोली अभियांञिकीचे प्राचार्य डाॅ. जी.बी. शिंदे यांनी केले.
चिंचोली (ता.सिन्नर) येथील औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर मोहू येथे विविध उपक्रमाने संपन्न झाले. कॅम्पसच्या मुख्य अधिकारी डॉ. सुष्मिताताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना चे जिल्हा समन्वयक डॉ. रवींद्र अहिरे, गावचे सरपंच प्रदीप साळवे ,उपसरपंच संतोष भिसे , माजी सरपंच सुदाम बोडके व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शोभा चव्हाण तसेच अध्यापक प्रा संदीप गिते , प्रा. प्रदीप शिंदे औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ चारुशिला भंगाळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. कावेरी वडीतके,प्रा. विठ्ठल विखे प्रा. शीलभद्र कदम उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेत आपण जीवन कौशल्य शिकतो, अनुशासन आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकायला मिळाली असे प्राचार्या डाॅ.चारुशिला भंगाळे यांनी सांगितले.
शिबीरांच्या माध्यमातून आरोग्य जनजागृती,पाणी बचत,ग्रामस्वच्छता,वृक्षारोपण,पर्यावरण संवर्धन आदीची जनजागृती स्वयंसेवकांनी केली.




