लोणी दि.२( जनता आवाज वृत्तसेवा ):-सहकार महर्षी पदमश्री डाॅ.विठ्ठलराव विखे पाटील करंडक न्यु आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगरच्या महेश जनार्दन उशीर आणि आकाश दत्तात्रय मोहीते यांनी पटकवला. वरीष्ठ गटात अहमदनगर येथील महेश जनार्दन उशीर प्रथम, मुंबई येथील यश रविंद्र पाटील द्वितीय, अहमदनगर येथील आकाश दत्तात्रय मोहीते तृतीय तर साईराज मोहन घाटपांडे याने उत्तेजनार्थ बक्षीसे मिळविले. तर कनिष्ठ गटात ज्ञानेश्वरी अरविंद नाईकवाडी प्रथम, कृष्णमाया बाळासाहेब यादव व्दितीय, अश्वीनी मिनीनाथ खेडकर तृतीय तर सानिका लक्ष्मण जोशी उत्तेजनार्थ यांनी यश संपादन केले.
लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्यश्री विखे पाटील महाविद्यालयाने आयोजित वादविवाद स्पर्धेच्या पारितोषिक वितरण माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या उपस्थित झाला. यावेळी सहसचिव भारत घोगरे,सिनेट सदस्य आणि संस्थेचे अतांञिकचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे,महाविद्यालयांचे कॅम्प संचालक डाॅ.आर.ए.पवार,विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य डाॅ.अण्णासाहेब तांबे, संयोजन समितीचे अध्यक्ष डाॅ.शांताराम चौधरी, परीक्षक डॉ.उज्वला भोर,भाऊसाहेब नवले,प्रा.शिवनाथ तक्ते,संयोजन समितीचे सदस्य डाॅ.राजेंद्र सलालकर, डाॅ.एम.यु.पाटील,डाॅ.बी.के.वाणी,डाॅ.व्ही.ए.खर्डे, डाॅ.के.पी.पलघडमल,प्रा.व्ही.ए.खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
जागतिक पातळीवर भारताचे नेतृत्व सिद्ध होत आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या राष्ट्रीय आणि जागतिक धोरणामुळे जगात देशाचे महत्व वाढत आहे. प्रवरेच्या माध्यमातून झालेल्या या वादविवाद स्पर्धेतून जी २० च्या अध्यक्षपदामुळे देशाची वाटचाल महासत्तेकडे सुरु झाली हा प्रस्तावाचा विषय महत्वपूर्ण ठरला असे सांगून विद्यार्थ्यांनी वकृत्व आणि कतृत्व सिद्ध करत पुढे जावे असे प्रतिपादन माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी केले.
यावेळी माजी मंत्री म्हस्के पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्रजी मोदीच्या ध्येय-धोरणामुळे जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा ही उंचावत आहे सर्वसमावेश विकास डिजीटल इंडीया, महीला- युवा धोरण, कौशल्य भारत, नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताची वाटचाल ही महासत्तेकडे सुरू झाल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी जय पराजय यांची चिंता न करता स्पर्धेत सहभागी व्हावे. विषयाचा सखोल अभ्यास करून पुढे जावे असे सांगितले.
४२ व्या वादविवाद स्पर्धेत राज्य भरातून ३० संघाचे ६० स्पर्धेक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. प्रदिप दिघे यांनी करतांना विद्यार्थ्यांनी वाचनातून आपले ज्ञान विकसित करावे असे सांगून स्पर्धेचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. वैशाली मुरादे आणि डॉ. एस. एम. वाकोले यांनी तर आभार डाॅ.आर.ए.पवार यांनी मानले.
अतिशय ज्वलंत प्रश्नांवर झालेली ही वादविवाद स्पर्धा ही मुलींनी चांगलीच गाजवली.यामध्ये प्रवरेच्या लोणी येथील पद्यश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयांच्या कन्यांनी विशेष यश संपादन केले.