नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ):-मुळा एज्युकेशन सोसायटी सोनईच्या ४५ व्या वर्धापनदिनानिमित्त उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या ५ दिवसीय कार्यक्रमाचाशुभारंभ चला हवा येऊ द्या फेम अभिनेते डॉ निलेश साबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला
याप्रसंगी बोलतांना उपाध्यक्ष उदयन गडाख म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केजी टू पी जी पर्यंतचे शिक्षण परिसरात उपलब्ध व्हावे या हेतूने मा खा यशवंतरावजी गडाख यांनी ४५ व्या वर्षी कारखान्याच्या खोल्यामध्ये पब्लिक स्कुलची सुरुवात करून केलेली संस्थां आज जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर शिक्षण क्षेत्रात काम करते आहे आहे
ही अभिमानास्पद बाब आहे.आ शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक भान जपत संस्था कार्यरत आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व कलागुणांना व्यासपीठ म्हणून यशोरंग महोत्सवाचे आयोजन केलें असल्याचे सांगितले व संस्था वाटचालीत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी बोलतांना प्रमुख पाहुणे डॉ निलेश साबळे म्हणाले जीवनात आपल्या आवडीच्या क्षेत्रात झोकून देऊन काम करा यश तुमच्या पायांवर लोटांगण घालील.जेथे आपण घडलो त्या परिसराला कधीही विसरू नका.कामात सातत्य ठेवा.कुठलेही काम छोटे नसते आपल्यामुळे कामाला प्रतिष्ठा प्राप्त होते.
कष्ट करण्यास घाबरू नका कष्टाने आलेले हसू चेहऱ्यावर चिरंतन टिकते असे डॉ निलेश साबळे म्हणाले व सोनई सारख्या ग्रामीण भागात मुळा एज्युकेशन सोसायटी विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण ज्ञान देण्यासाठी प्रयत्नशील आहे हे पाहून आनंद वाटला असे ते म्हणाले व उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनाचे कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ विनायक देशमुख यांनी केले
याप्रसंगी माजी विद्यार्थी व अहमदनगरचे जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक संतोष उंडे यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची वहावा मिळवली.
याप्रसंगी व्यासपीठावर डॉ निवेदिता उदयन गडाख,कु नेहल प्रशांत गडाख,सचिव उत्तमराव लोंढे,नानासाहेब रेपाळे,भाऊसाहेब गवळी,डॉ रंगनाथ मते आदींसह संस्थेचे विश्वस्त,कार्यकारी समिती सदस्य,शिक्षक पालक विद्यार्थी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मुळा एज्युकेशन सोसा सोनईचे विविध क्षेत्रात उच्च पदावर असलेले माजी विद्यार्थी,गुणवंत विद्यार्थी,पेटंट व पी एच डी मिळवलेले शिक्षक तसेच देणगीदार यांचा डॉ निलेश साबळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
डॉ निलेश साबळे यांनी भरला यशवंतचा मरणोत्तर नेत्रदान संकल्प फॉर्म..सोनई येथील आयोजित कार्यक्रमात डॉ निलेश साबळे यांनी मरणोत्तर नेत्रदान संकल्प फॉर्म भरला यावर साक्षीदार म्हणून युवा नेते उदयन गडाख यांनी सही केली.डॉ निलेश साबळे यांनी प्रतिष्ठानचा नेत्रदान संकल्प फॉर्म भरून काम करण्यास प्रेरणा दिली असे उदयन गडाख म्हणाले.