भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात युवा पिढीसाठी रोजगार निर्मिती करणे हे सरकारचे आणि अर्थव्यवस्थेसमोरील एक मोठे आव्हान आहे. याच कारणामुळे उद्योगजगत कौशल्य आधारित अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देत आहे. विद्यार्थ्यांची हीच गरज लक्षात घेऊन पायरेन्स आय.बी.एम.ए. मध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार रचना असलेले बी.व्होक – बँकींग फायनान्शियल सर्व्हिसेस अॅण्ड इन्शुरन्स (बी.एफ.एस.आय.), आणि बी. व्होक – सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट (एस.डी.) हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. शिक्षण संस्थांमधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी व उद्योग जगतात मागणी असणारे कौशल्य याचा गॅप विचारात घेऊन सदर अभ्यासक्रमाची निर्मिती केलेली आहे, ज्यात इंडस्ट्री इंटर्नशिप चा सामावेश केलेला आहे. हा अभ्यासक्रम नॅशनल स्कील क्वॉलिटी फ्रेमवर्कच्या अंतर्गत येतो, ज्यात ६०% सिद्धांतावर आधारीत आणि ४०% प्रात्यक्षिक अभ्यासक्रम जातो. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या करिअरच्या संधी संबंधी ऑनलाइन मार्गदर्शन वर्गाचे आयोजन पायरेन्स आय.बी.एम.ए. या संस्थेच्या वतीने दिनांक १३ जून २०२३ रोजी सकाळी दहा वाजता व दुपारी बारा वाजता गुगल मीटच्या माध्यमातून केलेले आहे.
बी.व्होक अभ्यासक्रम एक सक्षम पर्याय या विषयांवर मंगळवारी गुगल मीटवर चर्चासञाचे आयोजन
लोणी दि.१२( जनता आवाज वृत्तसेवा ):-१२ वी नंतर पुढे काय विद्यार्थी आणि पालकांना पडणारा हमखास प्रश्न आहे यांचे उद्देशाने पायरेन्स आय.बी.एम.ए. या संस्थेच्या वतीने बी. व्होक मधील करीअर संधी या विषयांवर मंगळवार दि. १३ जून २०२३ रोजी सकाळी दहा वाजता आणि दुपारी बारा वाजता गुगल मीटच्या माध्यमातून तज्ञ मार्गदर्शन करणार आहे अशी माहीती संस्थेचे सचिव डाॅ.निलेश बनकर यांनी दिली.
सदर कार्यक्रमाची नोंदणी करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ९६२३५६५०११ , ९८९०९१९९७२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पायरेन्स आय बी एम ए च्या वतीने करण्यात आलेले आहे.