श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – श्रीरामपूर तालुक्यातील आदिवासी समाजाचे प्रश्न समजावून घेण्यासाठी आमदार लहू कानडे यांनी कारेगाव येथे या समाजाशी संवाद साधत स्नेहभोजन घेतले. यावेळी गोरगरिबांचे दुःख समजून घेताना आनंद मिळतो, असे उद्गार आ. कानडे यांनी काढले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात एक विचारवंत आणि धाडसी नेतृत्व आहे. या देशाला स्वातंत्र्य, लोकशाही आणि समता देणारा काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवीला पाहिजे ही त्यांची तळमळ आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने काँग्रेस कार्यकर्ते अनेक उपक्रम राबवीत आहेत. श्रीरामपूर तालुक्याचे आमदार लहू कानडे आणि त्यांचे सहकारी हाच वैचारिक वारसा घेऊन समाजातील गरीब तळापर्यंत संवाद करत आहेत. याचाच भाग म्हणून कारेगाव येथील दलित आदिवासी भटके विमुक्त अशा सर्वसमावेशक असणाऱ्या फुलेनगरमध्ये संवाद व स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी आ. कानडे यांनी उपस्थित माता-भगिनींच्या अडीअडचणी समजून घेतल्या.
कष्टकऱ्यांशी संवाद करताना त्यांच्या स्मशानभूमीचा प्रश्न, जागेअभावी रखडलेल्या घरकुलाचा प्रश्न, तरुण मुलांच्या बेरोजगारीचा प्रश्न, लोंबकळणार्या विजेच्या तारांचा प्रश्न आणि नियमित न मिळणाऱ्या पाण्याचा प्रश्न समजावून घेतला. सर्व उपस्थितांशी मिळून मिसळून मुक्त संवाद केला.
येथील दत्तू वाघ या आदिवासी बांधवांच्या घरामध्ये सर्वांच्या सोबत आ.कानडे यांनी स्नेयभोजन घेतले. सर्व काँग्रेस जणांसाठी गोरगरिबांच्या वस्तीत रात्रीच्या वेळी एकत्रित स्नेय भोजनाचा हा वेगळाच आनंद होता. प्रेमाने उथंबलेलं गरीब माणसाचं आदरातीत्य बघून आमदार कानडेही भारावून गेले. “याच तुमच्या प्रेमाचा मी भुकेला असून मतदारसंघातील प्रत्येक वस्तीमध्ये जाऊन हा आनंद मी घेणार आहे”, असे भावोद्गार आ. कानडे यांनी याप्रसंगी काढले.
याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, विष्णुपंत खंडागळे, रमेश उंडे, अशोक (नाना) कानडे, सरपंच अशोक भोसले, दत्तू वाघ, साहेबराव पटारे, अँड. राजेंद्र कापसे, योगेश उंडे, गणेश पवार, विठ्ठल ठोकळ, संजय गायकवाड, विठ्ठल माळी, लक्ष्मण साळवे, अजय पठाण, सिकंदर पठाण, दिलीप खंडागळे, भाऊसाहेब ठोकळ, हेमंत टिळेकर, संजय गव्हाणे आदिंसह आदिवासी वस्तीतील माता भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.