पारनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा ता. पारनेर जि. अहमदनगर या तीर्थक्षेत्रावर बुधवार दि. ७ फेब्रुवारी २०२४ रोजी ब्रह्मलीन परमपूज्य संत श्री स्वामी गगनगिरी महाराज यांचा (समाधी दिवस )पुण्यतिथी सोहळ्याचे व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देवस्थान भाविक भक्त ग्रामस्थांनी केले आहे .
ब्रह्मलीन परमपूज्य श्री स्वामी गगनगिरी महाराज हे तपस्वी हटयोगी व सिद्ध पुरुष महात्मा होते. कोल्हापूर जवळ गगनबावडा येथील गगनगडावर गुहेत महाराजांचे शक्तिपीठ व तपस्थान आहे. तसेच फोंडा घाटातील दाजीपूर येथील अभयारण्यात माऊली कुंड झांजुचे पाणी इत्यादी महाराजांचे तपस ठाणे आहेत. खोपोली येथील योगाश्रमात श्री महाराजांचे समाधी आहे. १९९७ शुद्ध चंपाषष्ठीला श्री गगनगिरी महाराजांचे शुभ हस्ते श्री कोरठण खंडोबा पुरातन मंदिराचा जिर्णोद्धार पूर्ण होऊन सुवर्णकलाशरोहन झाले होते. या सोहळ्याला तीन लाखापेक्षा जास्त भाविक भक्त उपस्थित होते. त्यानंतर सलग पाच वर्ष महाराज चंपाषष्ठी महोत्सवाला उपस्थित राहून भावी भक्तांना दर्शन व आशीर्वाद देत होते.तेव्हापासून श्री कोरठण खंडोबाचे महात्म्य व वैभव वाढत राहिले .
श्री महाराजांनीच सुवर्ण कलशरोहन होण्यासाठी सांगितलेला शुद्ध चंपाषष्ठीचा मुहूर्त आणि त्यानुसार देवस्थानच्या इतिहासात सुरू झालेला चंपाषष्ठीचा महोत्सव हा महाराजांचा आशीर्वाद व अमूल्य ठेवा असल्याचे भाविक भक्त मानतात. सन २०१६ साली शुद्ध चंपाषष्ठीला श्री कोरठन खंडोबा देवस्थान जवळ श्री खंडोबा म्हाळसा घोड्यावरील पितळी मूर्तीच्या मंदिराखाली ध्यानमंदिर तयार करून त्यामध्ये देवस्थान तर्फे ब्रह्मलीन परमपूज्य श्री गगनगिरी महाराज यांची सुरेख मार्बल मधील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर सन २०१७ पासून श्री महाराजांच्या समाधी दिवस पौष कृ.कुश १२ प्रदोष देवस्थान भाविक भक्तातर्फे साजरा करण्यात येऊ लागला.
यावर्षी बुधवार दि.७ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराजांचे पुण्यतिथी सोहळ्याचे नियोजन धार्मिक कार्यक्रमांमध्ये साजरा करण्यात आयोजन करण्यात आले आहे .सकाळी सहा वाजता अभिषेक पूजा ,सकाळी सात वाजता होमवहन, नऊ वाजता गगनगिरी महाराज प्रतिमेची दिंडी सोहळ्यात कोरठण गड प्रदक्षिणा मिरवणूक निघेल. यामध्ये जय मल्हार विद्यालय श्री खंडेश्वर वारकरी शिक्षण संस्था विद्यार्थी, ग्रामस्थ, भक्त सहभागी राहतील. सकाळी साडेदहा वाजता ह भ प आकाश महाराज घोलप यांचे संगीत प्रवचन सकाळी ११:३०मिनिटांनी महाप्रसाद अन्नदान जय गगनगिरी सेवाभावी मंडळ,श्री संकल्प संजय विश्वासराव परिवार बेल्हे यांचे तर्फे महाप्रसाद नियोजन आहे. दुपारी एक वाजता भजन गायन याप्रमाणे सर्व कार्यक्रमांचा भक्तांनी लाभ घ्यावा असे निवेदन अध्यक्षा सौ.शालिनी घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे ,माजी अध्यक्ष व विद्यमान विश्वस्त ॲड.पांडुरंग गायकवाड ,सचिव जालिंदर खोसे ,खजिनदार तुकाराम जगताप, सहसचिव कमलेश घुले, विश्वस्त रामदास मुळे, चंद्रभान ठुबे,राजेंद्र चौधरी , धोंडीभाऊ जगताप, महादेव पुंडे ,सुवर्ण धाडगे ,सुरेश फापाळे ,दिलीप घुले, अजित मंहांडूळे, समस्त ग्रामस्थ यांनी केले आहे.