लोणी दि.३( जनता आवाज वृत्तसेवा ):-
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सात्रळ येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील एम. एस्सी ॲनालिटिकल केमिस्ट्रीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या दहा विद्यार्थ्यांची मॅकलिओड्स फार्मासिटिकल या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली अशी माहिती प्राचार्य डॉ.प्रभाकर डोंगरे यांनी दिली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने गागरे दीपक गागरे , ऋषिकेश कदम, पांडुरंग मुसमाडे, योगेश सरोदे, संकेत पठारे, इम्रान इनामदार, विपुल गाढे ऋतुराज सोळुखे, अजित पवार आणि धनंजय जरे यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षा पूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी कायमच अग्रभागी असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा नेहमीच फायदा होतो .महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल विभागाच्या अंतर्गत सतत विद्यार्थ्यांसाठी विविध प्रशिक्षण आयोजित केले जातात कार्यशाळा घेतल्या जातात. यामध्ये माजी विद्यार्थी हे सुद्धा विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो अशी माहिती ट्रेनिंग आणि प्लेसमेंट समन्वयक प्रा. सौ छाया कार्ले यांनी दिली.
संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे , माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के , जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे, खासदार डॉ. सुजय विखे सहसचिव श्री.भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे ,संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. मनोज परजणे यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभाकर डोंगरे ,उपप्राचार्य डॉ. जयश्री सिनगर, उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.