नगर (जनता आवाज वृत्तसेवा ):- कर्जत तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून दोन महिन्यापासून पसार असलेल्या सख्ख्या भावांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी पकडले आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
राजु समशुद्दीन शेख (वय 31) व अजीज समशुद्दीन शेख (वय 28 दोघे रा. थोटेवाडी, दुरगाव, ता. कर्जत) अशी त्यांची नावे आहेत. अल्पवयीन मुलगी स्वयंपाक घरात काम करत असताना राजु शेख व अजीज शेख यांनी पाणी पिण्याचा बहाणा करून घरात प्रवेश केला. तिचे दोन्ही हात बांधून तोंडात रूमाल कोंबुन अत्याचार केला होता. यासंदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यापासून शेख बंधू पसार झाले होते. ते केडगाव चौफुला (ता. दौंड, जि. पुणे) येथे असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती.