लोणी दि.५( जनता आवाज वृत्तसेवा ):-गुणवत्तापुर्ण शिक्षणासोबतचं विद्यार्थ्याच्या कलागुणांना व्यासपीठ देऊन शिक्षणातून संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे हाच प्रवरेचा ध्यास असून ग्रामीण विद्यार्थी हा सर्वगुण संपन्न असतो हेच विद्यार्थी वार्षिक संमेलन व्यासपीठावरुन सिध्द होते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील इंटरनॅशनल स्कूल व ब्रिलियंट बईस स्कूल, लोणीच्या ७ व्या स्नेहसंमेलन आणि परितोषिक वितरण कार्यक्रमात सौ.विखे पाटील बोलत होत्या. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने,प्रवरा कन्याच्या प्राचार्या भारती देशमुख, प्रवरा सेन्ट्रल पब्लिक स्कूलच्या प्राचार्या रोझमीन , प्रवरा गर्ल्स स्कुलच्या प्राचार्या रेखा रत्नपारखी,प्रा. प्रतिभा पाटील,शाळेच्या प्राचार्या सौ. दिपाली गव्हाणे यांच्यासह मोठ्या संखेने पालक उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था पुस्तकीय ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असते असे सांगतानाच लहानग्या विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले.
यावेळी शाळेतील नर्सरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. स्फूर्ती द स्पिरीट ऑफ इन्स्पिरेशन ही थीम बाल कलाकारांनी आपल्या कलागुणांनी सार्थ ठरविली.