असे अनेक प्रकारचे कारणामुळे नेहमी चर्चेत असतात.
कृषी विभागाने अकोल्यामध्ये टाकण्यात आलेल्या धाडीत समावेश असलेला आणि व्यावसायिकांना लाच मागणारा दीपक गवळी हा अब्दुल सत्तारांचा पीए असल्याचे पत्र समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील दौऱ्यातल्या शासकीय पत्रात गवळीचा सत्तारांचे स्वीय सहायक असा उल्लेख करण्यात आला आहे.
समोर आलेल्या शासकीय पत्राने कृषिमंत्र्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मात्र, अब्दुल सत्तार यांनी दीपक गवळी हा आपला पीए नसल्याचा उल्लेख केला आहे.
ठाकरे गटाचा नेते यांनी याबाबतीत सखोल चौकशी अशी मागणी केली आहे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावे अकोल्यामध्ये कृषी विभागाच्या कथित पदकाने धाडी टाकल्या होत्या. या पथकात अधिकारी नसलेल्या अनेक खासगी व्यक्तींचाही समावेश असल्याची माहिती समोर आली होती. यात अब्दुल सत्तार यांचा स्वीय सहाय्यक दीपक गवळी याचा देखील समावेश असल्याचे उघड झाले आहे. अशातच या पथकाने पैशाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका खत कंपनीच्या व्यवस्थापकाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे.
कंपनी विरोधात कारवाई लगेच आदेश देण्यात आले आहे.कृषी विभागाच्या विरोधात तक्रार करणाऱ्या कंपनी विरोधात कृषी विभागाने कारवाई सुरू केली आहे. मात्र, या धाडीत काही चुकीचे झाले नसल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटल आहे. या मतदारसंघातील माझ्या सहकाऱ्यांनी मला सांगूनच तेथे हजेरी लावली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. अकोल्यातून अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे ही कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आता दीपक गवळी नावावरून हे प्रकरण चांगलेच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अडचणी वाढण्याची शक्यता आहे
कृषी विभागाच्या वतीने अकोल्यातील काही कंपन्यांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. या धाडीमध्ये असलेल्या पथकाने पैशाची मागणी केली असल्याची तक्रार कंपन्यांकडून करण्यात आली. तसेच या धाडीमध्ये कृषी विभागाच्या अधिकाराऱ्यां व्यतिरिक्त अनेक खाजगी व्यक्ती असल्याचे समोर आले होते
अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप करण्यात आले होते. आता या प्रकरणात अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.