spot_img
spot_img

कर्जत बाजार समिती सभापतीपदी काकासाहेब तापकीर, उपसभापतीपदी पाटील अभय पांडुरंग यांची निवड

कर्जत (जनता आवाज वृत्तसेवा):- संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेले कर्जत बाजार समिती सभापती उपसभापती निवडीकडे होते.कर्जत बाजार समितीच्या  सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. मात्र, यात आमदार राम शिंदे यांनी बाजी मारली आहे. शिंदे गटाचे सभापती पदाचे उमेदवार काकासाहेब तापकीर यांना नऊ मते मिळाली. तर रोहित पवार गटाचे सभापती पदाचे उमेदवार यांना आठ मते मिळाल्याने ते पराभूत झाले, एक मत अवैध ठरल्याचे निवडणूक प्रक्रियेत दिसून आले.

उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिंदे गटाचे पाटील अभय पांडुरंग यांना दहा मते मिळाली त्यामुळे ते विजयी झाले. तर रोहित पवार गटाचे उमेदवार श्रीहरी कैलास शेवाळे यांना आठ मते मिळाल्याने ते दोन मतांनी पराभूत झाले. यामुळे पवार यांच्या गटाचे एक मत फुटल्याचे स्पष्ट होत आहे. सभापती पदाच्या मतदान प्रक्रियेनंतर एक मत बाद झाल्याचे स्पष्ट झाले. रोहित पवार यांच्या गटाचे नऊ सदस्य असतानाही आठच मते मिळाल्याने पवार गटाचा सदस्य फुटल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

दरम्यान, राम शिंदे  यांनी जामखेड पाठोपाठ कर्जत मधील ही बाजार समिती आपल्या ताब्यामध्ये घेत रोहित पवार यांना धोबीपछाड दिली आहे. जामखेड बाजार समिती निवडणुकीत राम शिंदे व रोहित पवार यांच्या दोन्ही पॅनलचे नऊ-नऊ सदस्य निवडून आले होते. त्यावेळी झालेल्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत ईश्वर चिट्ठीच्या आधारे निर्णय घेण्यात आला. त्यात शिंदे गटाचे उमेदवार हे सभापती पदी निवडून आले. त्यानंतर आज कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिंदे यांनी मतांच्या गणितात बाजी मारत पवार यांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

कर्जत व जामखेड या दोन्ही बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे उमेदवार निवडून आले आहे. फक्त जामखेड उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. आजच्या निवडीमुळे आमदार रोहित पवार यांच्या वर्चस्वाला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!