राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा):- उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्यामुळे शेतकरी नक्कीच सुखावणार असून भाजपा शासनामुळेच या कालव्यांना गती मिळून शेतकऱ्यांचे स्वप्नपुर्ण झाले असून अयोध्येत प्रभुरामाचे आगमन आणि आपल्याकडे आलेले पाणी यामुळे या भागालान्याय मिळाला असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे.
उत्तर नगर जिल्ह्यासह राहुरी तालुक्यासाठी वरदान असणारे निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे तांभेरे,कानडगाव, निंभेरे, तुळापूर, तांदूळनेर,वडनेर,कनगर,चिंचविहरे ,गुहायेथे जलपूजन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई विखे पाटील व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी राव कर्डीले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना धनश्री ताई विखे यांनी सांगितले की जिल्ह्याच्या विकासासाठी नामदार व खासदार साहेब सदैव प्रयत्नशील आहेत त्यांनी केलेल्या विकास कामामुळे जिल्ह्याचा विकास होत आहे निळवंडे कालवा व्हावा यासाठी विखे कुटुंबियांनी अनेक वर्ष प्रयत्न केलेले आहे आज तुमच्या गावापर्यंत पाणी येते हा केवळ तुमच्यासाठी नाही तर विखे कुटुंबासाठी आनंदाचा क्षण आहे उपस्थित शेतकऱ्यांच्या आनंदा मधून आम्हाला सर्वकाही मिळाले आहे यापुढे भरभक्कमपणे विखे कुटुंब जिल्ह्याच्या जनतेच्या मागे उभे राहील आणि हा जिल्हा सर्वत्र सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी प्रयत्नशील राहील असे त्या म्हणाल्या.
यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सुरेश बानकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे,रवींद्र म्हसे, भिमराज हारदे, नानासाहेब गागरे,डॉ बापूसाहेब मुसमाडे, सरपंच निशा गागरे,उत्तम राव मुसमाडे,संदीप गीते,मारुती नालकर,सर्जेराव गाडगे, संदिप गाडगे ,आणा पाटील बलमे, बबनराव कोळसे,विजय बलमे, यांच्या सह सर्व व पदाधिकारी ,अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.