लोणी दि.७( जनता आवाज वृत्तसेवा ):-शेतकरी महिलांनी केवळ उत्यादन न घेता यांवर प्रक्रिया करुन पुढे जाण्याची गरज आहे.केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या महिला सक्षमीकरणामुळे महीला या मुख्य प्रवाहात येत आहेत असे प्रतिपादन डॉ. दिपाली तांबे यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थचे व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित, कृषी महाविद्यालय लोणी च्या वतीने झरेकाठी (ता. संगमनेर) येथे महिलांसाठी “फळ प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी महाविद्यालयाच्या डॉ. दिपाली तांबे आणि प्रा. विशाखा देवकर यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. दिपाली तांबे यांनी आपल्या मार्गदर्शनात दुग्धजन्य पदार्थ यांची निर्मिती कशी करावी , त्याचे फायदे व त्या संदर्भातली भविष्यातील संधी याबद्दल माहिती दिली तर प्रा. विशाखा देवकर यांनी फळ प्रक्रिया व त्यापासून विविध पदार्थ निर्मिती यावरती महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेद्वारे महिलांना गृह उद्योग कसे करावेत याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.भारत वाकचौरे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले .सदर कार्यशाळेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोरक्षनाथ वाणी, सदस्य रायभान वाणी, प्रवरा माध्यमिक विद्यालय झरेकाठीचे मुख्याध्यापक श्री सांगळे , श्री पुलाटे , श्री तांबे, शारदा वाणी , मीना वाणी, मंगल पवार, संगीता शिंदे आदी उपस्थित होते.
सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शुभांगी साळोखे, कार्यक्रम समन्वयक डॉ. रमेश जाधव ,कार्यक्रम अधिकारी डाॅ. विक्रम अनाप यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम वर्षातील कृषीकन्या ऋतिका अनाप,अनुजा लवांडे, समृध्दी थोरात,शिवानी कडु , ईश्वरी आवाशंक यांनी प्रयत्न केले.