लोणी दि.७( जनता आवाज वृत्तसेवा ):-पदविका तंत्रज्ञानाचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या सृजनशिलतेला चालना देण्यासाठी राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळणे अत्यावश्यक आहे. स्पर्धेत भाग घेतल्यास विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागतो असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ छत्रपती संभाजी नगर येथील सहाय्यक सचिव पी.एस.सोळंकी यांनी केले.
लोणी येथील पद्मश्री डॉ. विखे पाटील पॉलिटेक्निक येथे राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी शासकिय तंत्रनिकेतनचे विभाग प्रमुख डॉ. के. बी. लढाणे, संचालक प्रा. दत्ता पाटील, उद्योजक शैलेन्द्र पांडे, सहसचिव भारत घोगरे, प्राचार्य डॉ. विजय राठी, प्राचार्य डॉ. संजय भवर, प्रा. संदीप गोर्डे, प्रा. रवींद्र काकडे, प्रा. नामदेव गरड उपस्थित होते.
राज्यस्तरीय स्थापत्य विभागाच्या पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत नाशिक, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधून विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. वैशाली म्हस्के, प्रा, निकीता कडू यांनी केले. प्रा. संदीप गोर्डे, समन्वयक प्रा. पुजा विखे, प्रा. गौरव वाल्हेकर, प्रा. राहूल विखे, प्रा. गणेश कडू, प्रा. एस.बी.पोकळे यांनी परिश्रम घेतले.