लोणी दि.९( जनता आवाज वृत्तसेवा ):-ग्रामीण विकासासाठी एकञित काम करून गावासाठी एक होऊ या हा संदेश देत लोणीच्या प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी शिबीर गोगलगांव येथे विविध उपक्रमाने संपन्न आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना स्वातंत्र्ययाचा अमृत महोत्सव निमित्त कॅम्पचे उदघाटन गोगलगावं येथे विखे पाटील कारखान्याचे संचालक संजय आहेर,प्रवरा बॅकेके संचालक बाळासाहेब गोर्डे यांचा हस्ते झाले.
कॅम्प मधील विद्यार्थ्यांनी गावातील परिसर, मंदिरे , स्मशानभूमीत इत्यादी ठिकाणी श्रमदान केले व कमिटी नुसार विद्यार्थ्यांनी दररोजचे जेवण स्वतःच्याच हाताने बनवले.कॅम्पचा समारोप विखे पाटील कारखान्याचे संचालक दादासाहेब घोगरे, माणिक रामभाऊ गोर्डे, सरपंच भाऊसाहेब खाडे,प्राचार्य डाॅ.संजय गुल्हने,डाॅ.संजय कुरकुटे,डाॅ.लक्ष्मण अभंग,प्रा.शकील शेख,संदिप तुरकणे,कार्यक्रम अधिकारी प्रा.सचिन अनाप,प्रा.राजेंद्र तांबे,प्रा.स्नेहल घोलप,विशाल पाटील,वैष्णवी पठारे,शाळेचे मुख्यध्यापक कैलास म्हस्के आदी उपस्थित होते.
गोगलगांव (ता राहाता) येथे मागील तीन वर्षापासून येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयं सेवकांकडून निर्मलग्राम, लोकसंख्ख्या नियंत्रण आली जनजागृती, नवमदार जागृती, महीला सक्षमीकरण, पाणलोट विकास, व्यक्तीमहत्व विकास, पर्यावरण संवर्धन, अक्षय ऊर्जा जनजागृती, स्वच्छता अभियान आदी बाबत ग्रामस्थामध्ये जनजागृती केली.