spot_img
spot_img

प्रवरेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील डाॅ.प्रताप विखे यांची अभ्यास मंडळावरती नियुक्ती

लोणी दि.११ ( जनता आवाज
 वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय, येथील डॉ. प्रताप सावळेराम विखे यांची इनस्टुमेंटेशन इंजिनिअरिंग विभागाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती झाल्याची माहीती प्राचार्य डाॅ.संजय गुल्हाने यांनी दिली.
विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर भर देत शिक्षणाचा प्रचार प्रसार आणि विद्यार्थी प्रिय म्हणून डाॅ.प्रताप विखे यांची ओळख असून अनेक शोधनिंबध आणि संशोधन क्षेञातही त्यांनी कामे केले आहे. 
  
 त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील ,खासदार सुजय विखे पाटील,सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्प मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ,अतांञिकचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे,शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे, प्राचार्य डाॅ.संजय गुल्हाने, प्रमुख डाॅ.चंद्रकांत कडू आदींनी अभिनंदन केले
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!