14.3 C
New York
Saturday, October 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी जयंत वाघ काळ संघर्षाचा पण भविष्य काँग्रेसचे : बाळासाहेब थोरात आम्ही एकजुटीने काम करू : किरण काळे

संगमनेर( जगता आवाज वृत्तसेवा ) : – अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी जयंत रामनाथ वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. वाघ यांना शुभेच्छा देताना थोरात म्हणाले, ‘काळ संघर्षाचा आहे मात्र भविष्य काँग्रेस पक्षाचे आहे, झोकून देऊन काम करा. आपण जिल्ह्यात काँग्रेस बळकटीने उभी करू.‘

अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी जयंत रामनाथ वाघ यांच्या नियुक्तीचा आदेश प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या सहीने निर्गमित करण्यात आला. जयंत वाघ हे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे विश्वस्त आहेत, यशवंतराव चव्हाण व्यासपीठचे उपाध्यक्ष, कबड्डी असोिएशनचे उपाध्यक्ष आदींसह विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांवर ते सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. जयंत वाघ यांचे वडील रामनाथजी वाघ हे जिल्हा परिषदेचे सर्वात लोकप्रिय अध्यक्ष तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीचे सात वर्षे अध्यक्ष राहिलेले आहेत. महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या विचारांवर श्रद्धा असलेले वाघ कुटुंबीय आहे.

आमदार थोरात म्हणाले, जयंत वाघ यांना मोठी पुरोगामी आणि वैचारिक परंपरा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काँग्रेस नक्की सक्षमपणे काम करेल असा मला विश्वास आहे. जयंत वाघ यांनी आजवर कायम कामाला प्राधान्य दिले. कोणत्याही पदाच्या अपेक्षेत ते अडकले नाही किंवा कधी कोणत्या पदासाठी त्यांनी आग्रह धरला नाही. आज या संघर्षाच्या काळात त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे, असाही विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण काळे म्हणाले, या कठीण काळामध्ये मी आणि जयंत वाघ आणि एकत्रितपणे जिल्ह्यात काम करू. एकजुटीने पक्षाचा विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करू‘.

यावेळी अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण काळे, ज्ञानदेव वाफारे, प्रताप शेळके, संपतराव म्हस्के, मिलींद कानवडे, सोमेश्वर दिवटे, हिरालाल पगडाल, विश्वासराव मुर्तडक, रामहरी कातोरे, . नवनाथ अरगडे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!