अशोकनगर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- महाराष्ट्र राज्य तंञशिक्षण मंडळाच्या विद्यमाने अशोक पाॕलिटेक्निक महाविद्यालय व फार्मसी महाविद्यावायाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उत्तर विभागीय क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज शनिवारी (ता.१०) दुपारी ३ वा. माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे हस्ते संपन्न होणार आहे.
अंतिम सामन्यानंतर अशोक जिमखाना मैदानावर संपन्न होणाऱ्या बक्षिस वितरण समारंभाचे अध्यक्षस्थानी अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, उपाध्यक्ष योगेश विटनोर, सचिव सोपानराव राऊत, व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, युवक नेते सिध्दार्थ मुरकुटे, सहसचिव भास्कर खंडागळे, समन्वयक तथा संचालिका सौ.मंजुश्री मुरकुटे, संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
सदर प्रसंगी उपस्थित रहावे, असे आवाहन अशोक पाॕलिटेक्निकचे प्राचार्य अंजाबापू शिंदे, उपप्राचार्य अरुण कडू, अशोक फार्मसीचे प्राचार्य प्रसाद कोते, क्रीडा समन्वयक सचिन कोळसे तसेच अध्यापकांनी केले आहे